मुंबई/प्रतिनिधी ः राज्यभरात सध्या कांद्याचे दर गडगडले असून, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला चांगला दर नसल्यामुळे विरोधकांनी मंगळ
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यभरात सध्या कांद्याचे दर गडगडले असून, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला चांगला दर नसल्यामुळे विरोधकांनी मंगळवारी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. कांद्याचे दर वाढावेत म्हणून राज्य सरकारने तातडीने कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तर, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन कांदा निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. सध्या केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात सध्या कांद्याचे भाव पडलेले आहेत. अशा स्थितीत सरकार कांदा उत्पादकाच्या पाठीशी आहे. नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले. दरम्यान, महाराष्ट्र हे भारतातील मोठ्या प्रमाणावर कांदे पिकवणारं राज्य आहे. कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा 33 टक्के वाटा असून कांद्याची प्रत चांगली असल्याने निर्यातीमध्ये सुद्धा राज्य अग्रेसर आहे. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी फक्त 500 ते 600 रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकर्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. कांद्याच्या दराबाबत सरकार विरोधात राज्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलने केली जात आहेत. कांद्याबरोबरच कापूस, सोयाबीन, हरभरा, द्राक्षाच्या पिकाला बाजारभावात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकर्यांचे प्रंचड मोठे आर्थिक नुकसान होत आहे. बार्शीतील एका शेतकर्याला कांदे विकल्यानंतर 2 रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. ही शेतकर्यांची एक प्रकारे थट्टाच आहे, असा संताप विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केला. कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारने यापूर्वी लागू केलेली कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरु करण्याची शेतकर्यांकडून मागणी होत आहे. नाफेड व मार्केटिंग फेडरेशनमार्फत सुद्धा कांदा खरेदी सुरू करणे गरजेचे आहे, असेही अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.
कांदा निर्यातीवर बंदी नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सरकारकडून कांदा खरेदी सुरू झाली आहे. यावर विरोधकांचा विश्वास नसेल तर हक्कभंग आणून दाखवा, असे आव्हान दिले. पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात नाफेडने खरेदी सुरू केली आहे. जिथे सुरू नसेल तिथे लवकरच सुरू केली जाईल. सरकारने आतापर्यंत 2.38 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी सुरू केली आहे. तसेच, कांदा निर्यातीवर बंदी नाही, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला.
कांदा उत्पादक शेतकर्याला दोन रुपयांचा चेक – राज्यातील एका कांदा उत्पादक शेतकर्याला त्याच्या पिकाच्या विक्रीपोटी दोन रुपयांचा चेक मिळाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. राज्य सरकारने सर्व कामकाज बाजून ठेवून शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी, अशी आग्रही मागणी अजित पवार यांनी आज केली. कांद्याच्या भावावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज कामकाज सुरू होण्याआधी विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन केले. या आंदोलनाचे पडसाद सभागृहातही उमटले. राज्यातल्या शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा असा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला.
COMMENTS