Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुरुष आणि महिला कुस्तीपटूंच्या खुल्या निवड चाचणीचे आयोजन

मुंबई : भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (NCOE), मुंबई तर्फे 12, 13 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय क्रीडा प्राधिकरण, श्री अट

बांगलादेशने रावळपिंडीत इतिहास रचला
न्यूझीलंडला ‘गिल’ वादळाचा तडाखा
कामेरीतील प्रो. कब्बडी स्पर्धेत शाहू क्रीडा मंडळ सडोली प्रथम
Kusti Spardha : महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणी पंढरपुरात

मुंबई : भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (NCOE), मुंबई तर्फे 12, 13 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय क्रीडा प्राधिकरण, श्री अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, आकुर्ली मार्ग, कांदिवली (पूर्व), मुंबई – 400101 येथे पुरुष आणि महिला कुस्तीपटूंसाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे.

राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (NCOE) च्या निवड झालेल्या क्रीडापटूंसाठी दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा पुढील प्रमाणे आहेत: पोषण तज्ञांनी शिफारस केलेल्या वास्तविकतेनुसार भोजन सुविधा आणि वैयक्तिक पोषण योजना, चांगल्या दर्जाच्या निवास सुविधा, प्रशिक्षकांच्या तज्ञ पॅनेलद्वारे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, क्रीडा सामुग्री संच, जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण पायाभूत सुविधा; देशांतर्गत तसेच परदेशी स्पर्धात सहभागी होण्याची संधी (निवडलेल्या खेळाडूंसाठी) आणि शैक्षणिक खर्च सहाय्य, वैद्यकीय सुविधा, सामर्थ्य आणि कंडिशनिंग तज्ञांकडून नवीनतम वैज्ञानिक समर्थन, फिजिओथेरपिस्ट, मसाज थेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ इ.

महत्वाची माहिती –

° रिक्त जागा: ग्रीको रोमन – 10, फ्री स्टाईल – 2, महिला कुस्ती – 2

° उपस्थित राहण्याची वेळ – 12/09/2024 रोजी सकाळी 8:00 वाजता.

° स्थळ: भारतीय क्रीडा प्राधिकरण श्री अटलबिहारी वाजपेयी, राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई — 400101

° निवड चाचण्यांमधील सहभागींना भोजन आणि निवास सुविधा प्रदान केली जाणार नाही.

पात्रता निकष

U-17, U-20 आणि U-23 वयोगटातील मुले आणि मुली.
मुलांचे वजन श्रेणी 57 किलो आणि त्याहून अधिक: फ्री स्टाइल.
मुलांचे वजन श्रेणी 65 किलो + ते 130 किलो: ग्रीको रोमन.
मुलींचे वजन श्रेणी 50 किलो आणि त्याहून अधिक: महिला कुस्ती.
राज्य स्पर्धेतील पदक विजेता/विजेती.
राष्ट्रीय स्पर्धेत 5 व्या स्थानापर्यंत पात्र ठरलेले कुस्तीपटू.
राष्ट्रीय मानांकन स्पर्धांमध्ये 5 व्या स्थानापर्यंत पात्र ठरलेला कुस्तीपटू.
टीप: मागील 2 वर्षांपर्यंतच्या (चाचणीच्या तारखेपासून) कमाल यशांचा विचार केला जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंची वय पडताळणी चाचणी घेतली जाईल.

चाचणीच्या वेळी आवश्यक असणारी कागदपत्रे.

जन्मतारीख प्रमाणपत्र
आधार कार्ड
क्रीडा यश प्रमाणपत्रे
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
पासपोर्ट आकाराची छायाचित्रे ( 2)
अधिक तपशिलांसाठी कृपया संपर्क साधा- मुख्य कुस्ती प्रशिक्षक राजसिंग चिक्कारा – 9416285830; एचपीएम रेसलिंग क्लबचे श्याम बुडाकी -9481775709; सहाय्यक कुस्ती प्रशिक्षक अमोल यादव, – 9503404427; किंवा सहाय्यक कुस्ती प्रशिक्षक शिल्पी शेरॉन- 9996292300.

COMMENTS