Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेते भारत गणेशपुरे यांना मातृशोक

अमरावती: प्रसिद्ध हास्‍य अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या आई मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे (८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्‍यांचे मरणोत्‍तर

राजपूत समाजापुढील ’भामटा’ शब्द काढणार मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही
तरच, संविधानावरील विश्‍वास दृढ होईल सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा विश्‍वास
पुणे विद्यापीठात अभाविपचा जोरदार राडा

अमरावती: प्रसिद्ध हास्‍य अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या आई मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे (८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्‍यांचे मरणोत्‍तर नेत्रदान करण्‍यात आले. सायंकाळी त्‍यांच्‍या पार्थिवावर रहाटगाव येथील स्‍मशानभूमीत अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येणार आहेत भारत गणेशपुरे यांचे बंधू मनीष यांच्‍या रहाटगाव येथील राहत्या घरी मनोरमाबाई यांनी अखेरचा श्‍वास घेतला. आईच्‍या निधनाचे वृत्‍त कळताच भारत गणेशपुरे हे मुंबई‍हून अमरावतीकडे निघाले आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ या दूरचित्रवाहिनी मालिकेच्‍या माध्यमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते भारत गणेशपुरे हे मूळचे अमरावती जिल्‍ह्याचे आहेत. मनोरमाबाई यांचे नेत्रदान करण्‍यास दिशा ग्रूपचे सचिव स्‍वप्निल गावंडे आणि मुंबई येथील दिग्‍दर्शक विराग वानखडे यांनी प्रेरित केले.

COMMENTS