Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुपर ५० बॅच सन २०२२ चा समारोप अभिनव उपक्रमाची सांगतासुपर ५० बॅच सन २०२२ चा समारोप

नाशिक: नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने ऑक्टोबर २०२२ मध्ये सुपर ५० या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरवात करण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत अनुसूचित जाती

रायफल शूटिंग स्पर्धेत कु. आयुषा भांड हिचे नेत्रदिपक यश
मुलीच्या लाजीरवाण्या कृत्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी
खैरी निमगांव रस्त्यावर केबल कंपनीचे नियमबाह्य खोदकाम

नाशिक: नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने ऑक्टोबर २०२२ मध्ये सुपर ५० या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरवात करण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५० विद्यार्थ्यांना जेईई,  सीईटी व जेईई ॲडव्हान्स परीक्षांचे परीक्षांसाठी निवासच स्वरूपाचे प्रशिक्षण हे देण्यात आले. सलग दोन वर्षाच्या निवासी स्वरूपाच्या अभ्यासक्रमानंतर ५० विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होऊन सदर विद्यार्थ्यांनी दि. २६ रोजी जेईई ऍडव्हान्स परीक्षा दिली. जेईई ऍडव्हान्स परीक्षा झाल्यानंतर सन २०२२ सुपर ५०उपक्रमातील विद्यार्थ्यांना दि. २७ रोजी निरोप समारंभ देण्यात आला.

सुपर ५० उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा इयत्ता १२वीचा निकाल देखील १०० टक्के लागला असून सुपर ५० उपक्रम २०२२ अंतर्गत निवड झालेले १००% विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले, असून यामध्ये २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्य मिळवले असून २९ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी उपाध्ये क्लास येथे भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, सर्व विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत सहभोजनाचा आनंद घेत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल जाणून घेतले. त्याचबरोबर ट्रेंपोलिंग पार्क येथे विविध खेळांचा आनंद घेतला. वृषभ इन्स्ट्रूमेंट्स प्रा.लि. या कंपनीचे चेअरमन नरेंद्र गोलिया यांनी या विद्यार्थ्यांना नोटबुक,बॅग, छत्री, पेन या वस्तु भेट दिल्या. यानंतर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला यावेळी उपशिक्षणाधिकारी उदय देवरे, वृषभ इन्स्ट्रूमेंट्स प्रा.लि.चेअरमन नरेंद्र गोलिया  गट शिक्षणाधिकारी मिता चौधरी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

COMMENTS