Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हे सहकारी कारखाना कार्यस्थळावर श्रीगुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता

कोपरगाव/ प्रतिनिधी - सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे दत्तजयंतीनिमीत्त आयोजित केलेल्या श्रीगुरुचरित्र पाराय

श्रीगोंद्यातून सव्वासहा लाखांचा गुटखा जप्त
ग्रामीण भागामध्ये महिलांच्या बँकांसमोर रांगाच रांगा
काँग्रेस सोडणार्‍यांवर पायरीवर उभी राहायची वेळः थोरात

कोपरगाव/ प्रतिनिधी – सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे दत्तजयंतीनिमीत्त आयोजित केलेल्या श्रीगुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व संचालक मनेष गाडे, त्यांच्या सुविद्य पत्नींच्या हस्ते नुकतीच करण्यात आली. स्नेहलता कोल्हे याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, धार्मिक अधिष्ठानामुळे प्रत्येकाचे जीवन सुखकर होते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकाराच्या माध्यमातून या परिसरात इवलेसे रोप लावले त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सहकाराच्या माध्यमातून संजीवनी उद्योग समुह कुटुंब तयार झाले आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचेे चेअरमन, युवानेते विवेकभैय्या कोल्हे हे संजीवनी कुटुंबाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशिल असतात. प्रारंभी मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार यांनीही पारायणार्थीना संबोधीत केले. शेवटी चंद्रकांत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS