नांदेड । प्रतिनिधी देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांनी आपल्या कार्यकाळात देशहितासाठी माहिती व तंत्रज्ञान, पाणीपुरवठा आदि क्षेत्रात उल्ले
नांदेड । प्रतिनिधी देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांनी आपल्या कार्यकाळात देशहितासाठी माहिती व तंत्रज्ञान, पाणीपुरवठा आदि क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली असून त्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळेच देशात संगणक क्रांती झाली आहे, आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपणा सर्वांच्या हातात न्ड्रॉईड मोबाईल आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने नवा मोंढा भागातील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात रविवारी सकाळी 11.30 वा.अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी आदरांजली आणि मार्गदर्शनपर भाषणात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते. या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनअण्णा हंबर्डे, माजी आ.हणमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, माजी सभापती बी.आर.कदम, जि.प.च्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले की, देशाच्या लोकसभेत प्रचंड बहुमतासह सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून स्व.राजीवजी गांधी यांनी नाव लौकीक मिळविला आहे.
COMMENTS