Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगणक शिक्षण ही काळाची गरज ः संजय जोशी

अकोले/प्रतिनिधी ः आजच्या संगणक युगात विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेपासून संगणक शिक्षण मिळणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे मान

अवैध कत्तलखान्यांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
‘योग दिना’ला कट्टरपंथीयांची दहशत; व्हिडीओ व्हायरल | LokNews24
आंबिजळगावमधून तुतारीला जोरदार पसंती : हभप बापूराव निकत

अकोले/प्रतिनिधी ः आजच्या संगणक युगात विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेपासून संगणक शिक्षण मिळणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी केले.ज्ञानवर्धिनी शाळेच्या रंगमंचासाठी सेवानिवृत्त शिक्षक तथा ज्ञानवर्धिनीचे चेअरमन मोरेश्‍वर धर्माधिकारी यांनी आपल्या आई-वडीलांच्या स्मरणार्थ 8 लाख 51 हजारांची देणगी यावेळी जाहीर केली.
हिंद सेवा मंडळ शताब्दी महोत्सव निमित्ताने ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा व बालक मंदिरच्या संगणक लॅब तसेच मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मॉडर्न संकुलाचे उदघाटन हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड.अनंत फडणीस,मानद सचिव संजय जोशी व मान्यवरांच्या  हस्ते उत्साही वातावरणात पार पडले.या सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात मानद सचिव संजय जोशी बोलत होते.यावेळी मंडळाचे सहसचिव रणजित श्रीगोड, दिलीपकुमार शहा,संचालक संजय छल्लारे, नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सहा.सचिव योगेश देशमुख, बाळासाहेब कुलकर्णी, सोमय्या हायस्कूलचे चेअरमन दत्तात्रय साबळे, सेवक प्रतिनिधी कल्याण लकडे, आदीनाथ जोशी, गिरीश पाखरे, आजीव सदस्यआयाज शेख, रामनिवास राठी, रामेश्‍वर रासने, अमोल वैद्य, माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, पतपेढीचे चेअरमन आदिक जोशी, मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संतोष कचरे, उपप्राचार्य प्रा.दीपक जोंधळे, उपप्राचार्या सविता मुंदडा, पर्यवेक्षक सुधीर जोशी, सुरेखा धर्माधिकारी, डॉ सुधाताई देशपांडे, पुष्पाताई वाणी, प्रभावती महाले, स्वाती सारडा, पुष्पा नाईकवाडी, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. जोशी पूढे म्हणाले की-शालेय कार्यक्रमात  पालकांचा सहभाग महत्वाचा असतो. इंग्रजी माध्यमांच्या शाळां पेक्षा मराठी माध्यमांच्या शाळांचा दर्जा चांगला आहे.मोरेश्‍वर धर्माधिकारी यांनी रंगमंचासाठी आठ लाख रुपयांची मदत जाहीर केल्याबद्दल धर्माधिकारी कुटुंबियांचे मंडळाच्या वतीने त्यांनी ऋण व्यक्त केले. अ‍ॅड. फडणीस यांनी अद्ययावत संगणक प्रयोगशाळा ही काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी मंडळाचे सहसचिव दिलीपकुमार शहा, नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी,ज्ञानवर्धिनीचे चेअरमन मोरेश्‍वर धर्माधिकारी,माजी चेअरमन अनिल जोशी,बालक मंदिरच्या चेअरमन स्मिता मुंदडा,आदिनाथ जोशी यांचेही भाषणे झाली. प्रास्ताविक व स्वागत मॉडर्न हायस्कूलचे चेअरमन सतीश बूब यांनी केले.ज्येष्ठ शिक्षिका दिलशाद सय्यद यांनी जय जय महाराष्ट्र हे राज्यगीत सादर केले.सूत्रसंचालन गणेश जोशी व प्रा.बाळासाहेब भोत यांनी केले तर आभार  ज्ञानवर्धिनीचे मुख्याध्यापक रावसाहेब नवले यांनी मानले. शेवटी सुधीर जोशी यांनी गायलेल्या वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS