Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची कामे तातडीने पूर्ण करा –  संभाजी माळवदे

नेवासा : नेवासा तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची कामे तातडीने पूर्ण करा व कामास विलंब करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करा

नांदेडमध्ये कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल
मोफत प्रवेशाच्या लॉटरीची प्रतिक्षा
14 उपप्रकल्प उभारणीसाठी 21 कोटींचे अनुदान

नेवासा : नेवासा तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची कामे तातडीने पूर्ण करा व कामास विलंब करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करा अन्यथा  अहिल्यानगर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयास टाळे ठोकण्याचा ईशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी निवेदनाद्वारे दिला. 

अहिल्यानगर जिल्ह्यात व  नेवासा तालुक्यात पाणी पुरवठ्याची हजारो कोटीची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुरु आहे. यात सात ते दहा गावे मिळून एक योजना अशा योजनाची कामे सुरु आहेत. यात पाणी साठवण टाक्या,पाण्याच्या सोअर्स पासून गावापर्यंत पाईप लाईन टाकणे , गावातील अंतर्गत पाईप लाईन टाकणे अशा कामाचा समावेश आहे. मोठया करोडोच्या बजेटची कामे असणाऱ्या या योजना काही केल्याने पूर्णत्वास जाण्यासाठी तयार नाही. या योजनाचा पूर्णत्वाचा कालावधी देखील उलटून गेला आहे. कालावधी उलटून वर्ष होण्यास आली आहेत. टाक्यांचे कामे अपूर्ण आहेत. पाणी सोअर्स पासून पाईप लाईन टाकण्याचे काम अपूर्ण आहे.गावातील अंतर्गत लाईन टाकण्यास सुरुवातच झाली नाही याला कारण म्हणजे ठेकेदारांचा हलगर्जीपणा व यांना पाठीशी घालणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी.कामे पूर्ण नं झाल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी झगडाव लागत आहे. हजारो कोटीच्या योजना, कोटीच्या कोटी बिले काढून सुद्धा काम अपूर्णच.या सर्व कारभाराची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी अहिल्यानगर येथे एमजेपीचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन नेवासा तालुक्यातील जीवन प्राधिकरणची कामे तातडीने सुरु करा तसेच मागील पाच वर्षात जी कामे केली आहेत त्या कामाची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामास विलंब करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदन द्वारे केली. वेळीच कारवाई न केल्यास अहिल्यानगर येथील एमजेपीच्या कार्यालयास टाळे ठोकून कार्यालयसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा ईशारा यावेळी कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन देऊन दिला. 

निवेदनावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे,नेवासा काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल, बसपाचे युवा नेते हरीश चक्रनारायण,  गुलाब पठाण, काँग्रेस उपाध्यक्ष सतीश तऱ्हाळ,भारतीय स्वाभिमानी संघांचे गणपत मोरे, काँग्रेसचे संदीप मोटे आदी उपस्थित होते.

COMMENTS