Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंदे यांच्या विरोधात खामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 

बुलढाणा प्रतिनिधी - उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्यानंतर अमरावती पदवीधर मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनि

आश्रमातील 3 गतीमंद तरुणींवर अत्याचार
आज अहमदनगर- आष्टी बारा डब्यांची पहिली प्रवाशी रेल्वे धावणार
पोपट कुंभार बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मनीत

बुलढाणा प्रतिनिधी – उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्यानंतर अमरावती पदवीधर मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल अमलकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना पाठिंबा देण्यासंदर्भात आमची बोलणी सुरू आहे आणि लवकरच त्याला यश मिळणार असल्याचे वक्तव्य डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केले होते. मात्र त्यानंतर आता वंचित चे उमेदवार अनिल अमलकार यांनी खामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डॉक्टर राजेंद्र शिंगणे किंवा महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यांकडून आमच्या नेत्यांसोबत बोलणे झालेले नाही. त्यामुळे डॉक्टर शिंगणे यांनी चुकीचे वक्तव्य करत मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा आचारसंहितेचा भंग असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार दाखल अनिल अमलकार यांनी शहर पोलीस स्टेशन ला दिली आहे.

COMMENTS