Homeताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेत्री तापसी पन्नूविरुद्ध इंदूरमध्ये तक्रार दाखल

मुंबई प्रतिनिधी -: 'पिंक' आणि 'जुडवा 2' सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी तापसी पन्नू लवकरच शाहरुख खानच्या

लातूरमध्ये होणार 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती
अबिटखिंड येथील 200 विद्यार्थांना शालेय साहित्याचे मोफत वाटप
गावित भगिनींची फाशीची शिक्षा रद्द

मुंबई प्रतिनिधी -: ‘पिंक’ आणि ‘जुडवा 2’ सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी तापसी पन्नू लवकरच शाहरुख खानच्या ‘डंकी’ या सिनेमात दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणारा ‘ब्लर’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. साऊथ आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिची प्रत्येक भूमिका अगदी चोखपणे पार पाडते. तापसी पन्नू पडद्यावर बोल्ड भूमिका साकारण्यासाठीही ओळखली जाते. नेहमीच ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा अभिनेत्री चर्चेत आली आहे. तापसीविरोधात तक्रार दाखल एवढंच नव्हेतर तापसी तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते आणि यामुळेच ती बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पुन्हा एकदा अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मध्य प्रदेशमधील इंदौरमध्ये तिच्या विरोधात तक्रार दाखल केली गेली आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंवर अनेक यूजर्सनी नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी आता तापसीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. छत्रीपुरा पोलिस स्टेशनचे एसएचओ कपिल शर्मा यांनी याबद्दल बोलताना सांगितलं की, “एकलव्य गौरकडून एक अर्ज आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नूने फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करताना लक्ष्मीचं लॉकेट घातलं होतं, असं लिहिलं आहे.” याचबरोबर यावेळी तिने डिपनेक ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे अर्जदाराचे म्हणणं आहे की, त्या लॉकेटसोबत डिपनेक ड्रेस घातल्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना आणि सनातन धर्माच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी.” असं त्या अर्जदाराचं म्हणणं आहे.

COMMENTS