Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला अत्याचार रोखण्यासाठी कटिबद्ध

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही ; अत्याचाराच्या शिक्षेसाठी कडक कायदे करणार

जळगाव : महिलांवर होणारे अत्याचार अक्ष्म्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका. त्याला कुठल्याही प्रकारे मदत करणारे वाचता कामा नये. पोलिस आण

पंतप्रधान मोदींनी रशियातील भारतीयांशी साधला संवाद
पंतप्रधान मोदी युक्रेनला देणार भेेट
पंतप्रधान मोदी पोलंड दौर्‍यावर रवाना

जळगाव : महिलांवर होणारे अत्याचार अक्ष्म्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका. त्याला कुठल्याही प्रकारे मदत करणारे वाचता कामा नये. पोलिस आणि कुठल्याही स्तरावर कारवाई झाली पाहिजे. सरकार येतील अन् जातील, पण नारी शक्तीकडे लक्ष दिले पाहिजे. महिला अत्याचार रोखण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, त्यासाठी आम्ही राज्यासोबत असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी जळगावमध्ये लखपती दिदी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, महिलांच्या रक्षणासाठी कायदे कठोर केले जात आहे. एफआयआर होत नाही, वेळ लागतो अशा अडचणी येत होत्या. मात्र आता अनेक अडचणी आम्ही न्याय संहितामधून दूर केल्या आहेत. ई-एफआयआर सुरू केल्या आहे. याने गडबड होणार नाही, आता जलद प्रतिसाद मिळेल. फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा दिली जात आहे. लग्नाच्या नावे फसवणूक होत होती, त्याबाबत कायदा केला आहे. महिलांच्या समस्यांसाठी केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या सोबत आहे, असे आश्‍वासन यावेळी त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरूवात करत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातातील मृतांना श्रद्धाजंली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जळगावमध्ये मला महिलांचा महासागर दिसत आहे. बचत गटासोबत जोडल्या गेलेल्या माझ्या महाराष्ट्रातील बहिनींना मोठी मदत झाली आहे. महाराष्ट्राचे संस्कार हे विश्‍वभरात पसरले आहेत. पोलंडमध्ये मला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले. तिथले लोक महाराष्टियन लोकांचा सन्मान करतात. पोलंडमधील अनेक माता बहिणींना कोल्हापुरातील राज घराण्याने आश्रय दिला. जळगाव ही संत मुक्ताईची भूमी आहे.

महिलांना घरातून गुन्हा नोंदवता येणार – पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता महिलांना घरात बसून एफआयआर दाखल करता येणार आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत आहोत. महिला अत्याचारावर शिक्षेसाठी कडक कायदे करणार आहोत, महिलांवर अत्याचार करणारा वाचला नाही पाहिजे. यासोबतच आम्ही महिलांसाठीच्या योजना वाढवणार आहोत. ग्रामीण भागातील महिला उत्पन्न वाढीसह देश मजबूत करत आहेत. आधुनिक शेतीसाठी नारीशक्तीला नेतृत्व देत आहोत, यातून नवीन विचार पुढे येईल असे त्यांनी म्हटले आहे. पूर्वी मुलींसाठी बंदी असलेले क्षेत्र आम्ही आता सुरू करत आहोत. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महिलांसाठी मोठे बजेट ठेवलेले आहे.

राज्यातील 50 लाख महिलांना लखपती बनवणार ः  अजित पवार
अजित पवार म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वातील विकासाचा रथ जळगावात आला आहे. मी आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात एवढ्या प्रचंड संख्येने महिलांनी महाराष्ट्रात पंतप्रधानांचं स्वागत केल्याचे पाहिले नव्हते. हे मी पहिल्यांदाच पाहत आहे. देशातील 3 कोटी महिलांना लखपती बनविण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. महाराष्ट्रातील 50 लाख महिलांना लखपती बनवणार आहे.

देशाचा कारभार 2029 पासून महिलांकडे देणार ः फडणवीस – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिलांना संधी दिली तर त्या विश्‍व बदलू शकतात. महिला अर्थव्यवस्थेचा मुख्य धारेत आल्या तरच विकास होऊ शकतो. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाचा कारभार 2029 पासून महिलांकडे देणार आहेत. महाराष्ट्रातील 75 लाख परिवार हे बचत गटापासून जोडले आहे. 2 कोटी जनतेला बचत गटाशी जोडण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. तर मोदींच्या नेतृत्वात महिलांचा विकास सुरू आहे, असे म्हणत भारताला विकसित भारत करायचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.

लाडकी बहिण योजनेमुळे महिला आनंदी ः मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडकी बहिण योजनेमुळे महिला आनंदी झाल्या आहेत. जळगाव ही सोन्याची भूमी असून माझ्या बहिणी सोन्यापेक्षा सरस आहे. आमच्या सरकारकडून महिलांना 3 सिलिंडर मोफत देण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींच्या काळात 10 कोटी महिला स्वावलंबी झाल्या आहेत.

COMMENTS