Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 श्रीक्षेत्र त्वरितादेवी मंदिरावर पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ

तलवाडा प्रतिनिधी - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्वरितादेवी मंदिरावर पेव्हर ब्लॉक बसविणे व सिमेंट रस्ता करणे

आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची डील? शाहरूखकडून करणार होते वसूल
राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते
बसवर दगडफेक; २ महिला प्रवासी जखमी | LOK News 24

तलवाडा प्रतिनिधी – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्वरितादेवी मंदिरावर पेव्हर ब्लॉक बसविणे व सिमेंट रस्ता करणे या कामासाठी आ.लक्ष्मण अण्णा पवार यांनी एक कोटी रूपयाचा निधी शासनाकडून मंजूर केला असून मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दिलीप नाटकर यांच्या शुभहस्ते पुजन करून व श्रीफळ फोडून काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी कनिष्ठ अभियंता श्री कुलकर्णी साहेब, बाळराजे कन्स्ट्रक्शनचे मालक – बप्पासाहेब घाटूळ (नाना), पं.स.सदस्य – प्रा.शाम कुंड, विश्वस्त मंडळाचे सचिव – शेषराव उर्फ राजाभाऊ खिस्ते, सदस्य बाबुराव शिंगणे, मंदिराचे पुजारी भक्तिदास रायते, रवि रायते, दिपक रायते, वसंत हाटकर, रतन गिल, राजेंद्र विटकर, पत्रकार बापू गाडेकर आदीजण उपस्थित होते. तसेच 9 मिटर रूंदीच्या सिंमेट रस्त्याचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे असे बाळराजे कन्स्ट्रक्शनचे मालक – बप्पासाहेब नाना घाटूळ यांनी यावेळी बोलताना सांगितले. पेव्हर ब्लॉक बसविणे व सिमेंट रस्ता करणे हे काम एक कोटी रूपये खर्चाचे असून हि दोन्ही कामे दर्जेदार पध्दतीने करण्यात येतील व या कामामुळे भाविकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल असे कनिष्ठ अभियंता श्री कुलकर्णी साहेब यांनी याप्रसंगी  बोलताना सांगितले.

COMMENTS