अहमदनगर ः आषाढ पौर्णिमेला जगभरात विशेष महत्व असून, याच दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांनी समस्त मानव जातीला अविद्येच्या अंधकारातून मुक्त करणारे आणि
अहमदनगर ः आषाढ पौर्णिमेला जगभरात विशेष महत्व असून, याच दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांनी समस्त मानव जातीला अविद्येच्या अंधकारातून मुक्त करणारे आणि प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये आणणारे ज्ञान पेरले तो हाच दिवस. याच दिवसापासून बुद्ध धम्मातील पवित्र अशा वर्षावासाला सुरूवात होते. अहमदनगर शहरात देखील प्रतिभा देठे आणि भाऊसाहेब देठे यांच्या निवासस्थानी वर्षावास आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या प्रबोधन पर्व कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी कल्पनाताई कांबळे व प्राध्यापक विश्वासराव कांबळे यांच्या वतीने तसेच बौद्ध संस्कार संघाच्या वतीने गेली 23 वर्षापासून वर्षावास अखंडपणे चालू असल्याने भाऊसाहेब देठे व प्रतिभाताई देठे यांचे गुरुपूजन करण्यात आले. त्रिशरण पंचशील झाल्यानंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन कल्पनाताई कांबळे आणि ममता वाघमारे यांनी केले. यावेळी अॅडवोकेट दिलीप काकडे निर्मित धम्मसहिता यूट्यूब चॅनलची माहिती देण्यात आली. या धम्मसंहिता यूट्युब चॅनेलवरती चार महिने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथावरील सखोल माहिती देण्यात येणार आहे. तरी तमाम बौद्ध बांधवांनी या यूट्यूब चॅनलवरती ही माहिती दर रविवारी पाहण्याचे आवाहन उपस्थित उपासक आणि उपासिकांना करण्यात आले. आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमापर्यंत दर रविवारी अहमदनगर शहरांमध्ये विविध भागांमध्ये वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी सेवानिवृत्त सिव्हिल सर्जन तथा राज्य आरोग्य संचालक डॉ. एस. एम. सोनवणे, जिल्हा प्रयोगशाळा अधिकारी अनिल अंबावडे, रक्षा मंत्रालय अधिकारी सुनील ओव्हाळ, मुख्याध्यापक एस. के. गायकवाड, इंजि. खरात, सचिन वाघमारे आदी उपासक व उपासिका उपस्थित होत्या.
COMMENTS