Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. तांबे यांची स्टेअर्स महाराष्ट्र गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड

संगमनेर ः महाराष्ट्रातील युवकांच्या रोजगार स्वयंरोजगारासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवणारे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे य

राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कोपरगावच्या पाच खेळाडूंची निवड
राहुरीकरांच्या संकटाला आता ती धावून जाणार
ब्राम्हणगावात पोलिसांचे संचलन

संगमनेर ः महाराष्ट्रातील युवकांच्या रोजगार स्वयंरोजगारासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवणारे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे युवक आमदार सत्यजित तांबे यांची स्टेअर्स महाराष्ट्र गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे मान्यता प्राप्त राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन संस्थेने एक महाराष्ट्र एक ध्येय या उपक्रमाची घोषणा केली असून स्टेअर्स महाराष्ट्र गव्हर्नमेंट चे अध्यक्षपदी सत्यजित तांबे यांची निवड झाली आहे.
वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजित तांबे यांनी जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून राज्यभरातील तरुणांसाठी कला क्रीडा क्षेत्रात मोठे काम केले आहे. एक महाराष्ट्र एक ध्येय या उपक्रमांतर्गत तळागाळातील क्रीडा विकासाला चालना देणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील युवा खेळाडूंचे सक्षमीकरण करणे हा उपक्रम महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे या उपक्रमात जय हिंद युवा मंच आणि युनोव्हेशन केंद्राच्या माध्यमातून अनेक युवक यामध्ये सहभागी होणार आहे. यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, स्टेअर्स फाउंडेशनच्या सहकार्याने एक महाराष्ट्र एक ध्येय हा उपक्रम जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण राबवणार आहोत. क्रीडापटूंच्या पुढच्या पिढीचे पालक पोषण करण्यासाठी तळागाळात क्रीडा विकास करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध क्रीडा संस्कृतीमुळे हा उपक्रम संभाव्यपणे जीवन बदलू शकतो .आणि खेळात योगदान देऊ शकतो. भारताच्या ऑलिम्पिकच्या आकांक्षाच्या दृष्टीने या उपक्रमाद्वारे शिस्त, सांघिक कार्य आणि लवचिकता तयारीची मूल्ये रुजवण्यासाठी प्रयत्न होईल. व्यक्ती केवळ खेळात यश मिळवण्यासाठी नाही तर जीवनात यश मिळवण्यासाठी ही धडपड करत असतो .त्या करता प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS