Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. राहुल कुल यांना आरोग्यसेवेचा आशीर्वाद ; कोविड काळातील काम आजही स्थानिकांच्या लक्षात

दौंड : खरंतर डॉक्टरांना देवदूतच म्हटले जाते. कारण आजारी व्यक्तीला, मृत्यूच्या दाढेत असलेल्या व्यक्तीला बरे करण्याचे कसब डॉक्टरांजवळच असतात. मात्र

उदयनराजे आज रायगडावर करणार आत्मक्लेश
स्पर्धेतूनच बहुआयामी व्यक्तीमत्व घडते ः डॉ. महेंद्र चितलांगे
विवाहितेचा विनयभंग करणे आले अंगलट

दौंड : खरंतर डॉक्टरांना देवदूतच म्हटले जाते. कारण आजारी व्यक्तीला, मृत्यूच्या दाढेत असलेल्या व्यक्तीला बरे करण्याचे कसब डॉक्टरांजवळच असतात. मात्र अनेकांना डॉक्टरांची ही सेवा मिळत नाही, किंबहून ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र याच सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळवून देण्याचे आरोग्यसेवेचे काम आमदार राहुल कुल गेल्या कित्येक वर्षांपासून अविरतपणे करतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना देखील त्यांची आरोग्यसेवा सुरूच आहे. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य जनता आरोग्यदूत म्हणून त्यांच्याकडे पाहतांना दिसून येत आहे.
गेल्या महिन्याभरापासून विधानसभेची रणधुमाळी सुरू असतांना देखील आमदार राहुल कुल यांनी तब्बल 20 हून अधिक रूग्णांना मदत केली आहे. त्यामुळे कुल यांची आरोग्यदूत ही ओळख पुन्हा अधोरेखित होतांना दिसून येत आहे. प्रचार सभेत असताना देखील त्यांना आरोग्य सेवेचा निरोप आल्यानंतर आपल्या स्वीय सहाय्यकाच्या मार्फत त्यांनी संबंधित रुग्णाचे काम मार्गी लावले आहेत. एक प्रकारे मदतीचा हात या रुग्णांना दिला आहे. आमदार राहुल कुल यांनी गेल्या दहा वर्षात रुग्णसेवेचे हजारो कामे केलेली आहेत. कोरोनाच्या काळात देखील आमदार कुल यांनी आरोग्यदूत होवून जनतेची सेवा केली होती. आमदार राहुल कुल यांनी कोरोना काळात सर्वजण घरात बसले असताना चौफुला येथे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे डेडिकेटेड कोविड सेंटर काढले. या ठिकाणी 5000 रुग्णांवर मोफत उपचार केले. तसेच तालुक्याचा विकास करताना ‘पूर्वी जेथून खराब रस्ता सुरू होतो तेव्हा दौंड तालुका सुरू झाला’ असे म्हटले जायचे. आज ‘जेथून चांगला रस्ता सुरू झाला, तेथे दौंड तालुका सुरू झाला’ असे अभिमानाने म्हटले जाते, ही आमदार राहुल कुल यांच्या कामाची पावती आहे. राज्यातील एकूण चिबड जमिनींपैकी 7 टक्के चिबड जमीन दौंड तालुक्यात आहे. त्यामुळे भविष्यामध्ये चिबड जमीन निर्मूलन कार्यक्रम हाती घेणार असून, लोकवर्गणीशिवाय पाणथळ जमिनींचा प्रश्‍न सोडवणार असल्याची ग्वाही आमदार राहुल कुल यांनी दिली आहे. माजी आमदार सुभाषअण्णा कुल व कानगाव येथील पांडुरंग गवळी यांनी कानगावच्या विकासासाठी प्रयत्न केले. आगामी काळात या परिसरातील रेल्वेमार्गावर उड्डाण पूल उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्‍वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला आहे. कोविड, आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील आमदार राहुल कुलांच्या विजयात ही रुग्णसेवा आणि आशीर्वादाचा कामाला आल्याचे बोलले जात आहे. निवडणूक काळात त्यांनी केलेल्या या रुग्णसेवेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचार काळात राहुल कुल हे करीत असलेले आरोग्य सेवेचे काम त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल, असा विश्‍वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला आहे. आमदार राहुल कुल यांच्या कामामुळे समाजातील विविध घटकांमध्ये विश्‍वास आहे की, त्यांनी केलेली विकास कामे पुढे नेण्यासाठी ते सक्षम आहेत. दौंडमधील उपक्रम, शिक्षण प्रणालीचे सुधारणा, आणि लोकांच्या आधारावर त्यांचे काम चालू आहेत. त्यामुळे दौंडकरांची आमदार राहुल कुल यांच्याच नावाला पसंदी असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS