Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. रोहित पवारांच्या माध्यमातून उद्या विकासकामांचे भूमिपूजन

शहराध्यक्ष प्रा. विशाल मेहेत्रे यांची माहिती

कर्जत : आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून कर्जत-जामखेड मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा तसेच मतदारसंघातील माता-

केंद्रीय संस्थाचा वापर आवाज दाबण्यासाठी होत आहे- आ. रोहित पवार
आ. रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवारांचे आंदोलन

कर्जत : आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून कर्जत-जामखेड मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा तसेच मतदारसंघातील माता-भगिनींसाठी ’बंधन-नातं विश्‍वासाचं, सन्मानाचं’ या रक्षाबंधन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायक जुईली जोगळेकर आणि इंडियन आयडल फेम रोहित राऊत यांच्या मराठी व हिंदी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. खा. सुप्रिया सुळे  खा.निलेश लंके यांच्या उपस्थितीत कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथे रविवारी (25 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत शहराध्यक्ष प्रा. विशाल मेहेत्रे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
पुढे ते म्हणाले, आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत-जामखेडमध्ये गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे मंजूर करून करून ती पुर्ण करण्यात आली. यामधे कर्जतमधील व्यापारी संकूलसाठी 9 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला असून याठिकाणी 116 गाळे बांधण्यात येत आहेत. कर्जतमध्ये विविध सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी त्यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उभारणीचे काम हाती घेतले असून त्यासाठी 4.99 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून आणला. या इमारतीच्या माध्यमातून प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, कृषी विभाग, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय ही कार्यालय एका छताखाली येणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचण्यास मदत होईल शिवाय कामेही वेगाने मार्गी लागतील. कर्जत एसटी डेपो चे कामही पुर्ण झाले आहे आणि या डेपोमध्ये व्यापारी गाळे काढण्यात येत असून ते गाळे मतदारसंघातील होतकरू तरुणांना व्यवसाय करण्यासाठी देण्यात येणार आहेत. संत सद्गुरु गोदड महाराज भक्त निवास (5 कोटी), कर्जत उपजिल्हा रुग्णालय (44.84 कोटी), शासकीय विश्रामगृह (4.38 कोटी),  कर्जत नगरपरिषद इमारत (5 कोटी),  पोलीस वसाहत (7.12 कोटी), महसूल कर्मचारी निवासस्थान (13.80 कोटी) ही कामे देखील पूर्ण झाली असून याचेही लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात जामखेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात जामखेड नगरपरिषद, पंचायत समिती इमारत, नाना-नानी पार्क, सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक सभागृह अशा एकूण 82 कोटी 58 लाख रुपये खर्चाच्या कामाचे लाकार्पण करण्यात आले आहे. यावेळी 3.88 कोटी रुपये खर्चून पूर्ण केलेल्या कर्जत पंचायत समितीचा पहिला मजला, 1 कोटी रुपये खर्चाचे स्व.जीवनराव उर्फ बापूसाहेब ढोकरीकर अत्याधुनिक अग्निशमन केंद्र या विकासकामांचे लोकार्पण आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांसाठी 19 कोटी रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधायुक्त निवास्थाने उभारण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी  व पाटेगाव येथे होणार्‍या रक्षाबंधन सोहळ्यासाठी मतदारसंघातील नागरिक, माता- भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन आ. रोहित पवार मित्र मंडळ यांच्याकडून करण्यात येत आहे. पत्रकार परिषदेसाठी युवक शहराध्यक्ष नामदेव थोरात, माजी शहराध्यक्ष सुनील शेलार, विद्यार्थी शहर प्रमुख प्रतीक ढेरे, सोशल मीडिया शहर प्रमुख मंगेश शिंदे, शहर उपाध्यक्ष संजय भिसे, शहर उपाध्यक्ष मनोज गायकवाड, शरीफ पठाण, रज्जाक झारेकरी, युवक शहर उपाध्यक्ष ड. ऋषी पाटील, युवक शहर उपाध्यक्ष सुमित भैलुमे, युवक शहर उपाध्यक्ष प्रमोद रोडे, माजी युवक शहराध्यक्ष राहुल नेटके, प्रसाद जेवरे हे उपस्थित होते.

COMMENTS