Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. बाळासाहेब थोरात हे निर्मळ व स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व- अरुण भाई गुजराथी

जनसेवेचा यशोधन पॅटर्न अनुकरणीय यशोधन कार्यालयास सदिच्छा भेट

संगमनेर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राला चांगल्या नेतृत्वाची मोठी परंपरा आहे .मात्र सध्याच्या राजकारणातील चिखलफेक हि अत्यंत दुर्दैवी असून अशा परिस्थित

मुळा धरणातील गाळ काढण्यासाठी येणार वेग
ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्य सचिवपदी राजेंद्र वाघमारे
अहमदनगर शहरातून मोटार सायकल चोरणारे चार गुन्हेगार जेरबंद

संगमनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्राला चांगल्या नेतृत्वाची मोठी परंपरा आहे .मात्र सध्याच्या राजकारणातील चिखलफेक हि अत्यंत दुर्दैवी असून अशा परिस्थितीतही राजकारणात  स्वच्छ प्रतिमा, सुसंस्कृत विचार, सर्व पक्ष विरहित मैत्रीपूर्ण संबंध, जपणारे आणि सातत्याने गोरीगरिबांच्या विकासासाठी काम करणारे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे सात्विक, निर्मळ आणि स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व  असल्याचे गौरवोद्गार  विधानसभेचे माजी सभापती अरुण भाई गुजराथी यांनी काढले असून यशोधन कार्यालयाच्या कामाच्या पॅटर्नचे कौतुक त्यांनी केले.

      ज्येष्ठ नेते अरुण भाई गुजराथी यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी समवेत मा. आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे ,इंद्रजीत भाऊ थोरात, उप प्राचार्य प्रा दिवाकर पवार यांचेसह कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व विभागांना भेटी देत यशोधन कामाच्या पॅटर्नचे कौतुक त्यांनी केले.

       याप्रसंगी बोलताना अरुण भाई गुजराथी म्हणाले की, महाराष्ट्राला थोर नेतृत्वाची परंपरा असून ही परंपरा जपण्याचे काम आमदार बाळासाहेब थोरात हे करत आहेत .पक्ष विरहित सर्वांची त्यांची मैत्री असून राज्यभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे गोरगरीब व कष्टकरी यांच्यासाठी त्यांनी सातत्याने अविश्रांतपणे काम केले आहे.

      राज्यात विविध खात्यांचा यशस्वी कार्यभार सांभाळताना एक सात्विक आणि स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व म्हणून आज ते राज्यात ओळखले जात आहेत. स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा आमदार बाळासाहेब थोरात यांनी जोपासताना सहकाराचे नवे मॉडेल संगमनेर मध्ये उभारलेले आहे .संगमनेर शहर, विकसित तालुका, येथील सहकार, शिक्षण, शेती ,व्यापार ,आर्थिक समृद्धी हा विकासाचा पॅटर्न इतर तालुक्यांसाठी अनुकरणीय आहे. सततचे काम हेच या विकासाचे सूत्र आहे नव्या पिढीनेही राजकारणात आमदार थोरात यांचा आदर्श घेतला पाहिजे
तर मा.आ डॉ सुधीर तांबे यांनी पाच जिल्ह्यांमध्ये 54 तालुक्यात मोठा मित्रपरिवार जमवला आहे आणि हीच संगमनेर परिवाराची मोठी ताकद आहे.

        संगमनेरची बस स्थानक हे एअरपोर्ट वाटत असून नव्याने होत असलेल्या कारखाना ते बस स्थानक रस्ता हा मॉडेल रस्ता ठरणारा रस्ता असून प्रगत असलेल्या या शहरात वृक्ष संख्या जास्त असल्याने हिरवाईचे शहर हे संगमनेरचे वैशिष्ट्य होत असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे

       तर मा.आ डॉ तांबे म्हणाले की, निवडणूक संपली की राजकारण सोडून सर्वांना बरोबर घेत विकासाचे काम आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. विस्ताराने मोठा असूनही संगमनेर तालुक्यातील आर्थिक समृद्धीने सर्वसामान्यांच्या जीवनात मोठा आनंद निर्माण केले असल्याचे ते म्हणाले. यावेळी यशोधन कार्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला

COMMENTS