Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. आशुतोष काळेंनी सपत्नीक ढोल वाजवत दिला बाप्पाला निरोप

कोपरगाव ः कोपरगाव शहरासह मतदार संघात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मत

पश्‍चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्यासाठी सकारात्मक
चित्रकला स्पर्धा उद्योन्मुख चित्रकारांसाठी उत्तम व्यासपीठ ः आ. काळे
पाटबंधारे विभागाकडून उन्हाळी आवर्तन सोडण्याची तयारी सुरू

कोपरगाव ः कोपरगाव शहरासह मतदार संघात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देवून या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत सपत्नीक सहभागी होवून ढोल बजावत लाडक्या बाप्पाला निरोप देवून गणेश भक्तांचा उत्साह वाढविला. कोपरगाव मतदार संघातील जनतेला सुखी ठेवून मतदार संघाच्या विकासासाठी बाप्पा तुझे आशीर्वाद पाठीशी राहू दे अशी प्रार्थना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी श्री गणेशाच्या चरणी केली. ढोल ताशा हा सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा अविभाज्य भाग आहे.पुणे-मुंबई या शहराप्रमाणे प्रत्येक शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला ढोल ताशा पथक सहभागी होत असतात. ढोल-ताशांच्या तालावर नाचत, गात गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाला निरोप देण्यासाठी असंख्य गणेश भक्तांच्या समवेत ढोल बजावण्याचा आनंद मनाला आतिशय समाधान देणारा होता अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी दिली आहे.

COMMENTS