शेवगाव तालुका ः लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024अनुषंगाने तहसील कार्यालय शेवगाव व आबासाहेब काकडे फार्मसी कॅम्पस बोधेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 2

शेवगाव तालुका ः लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024अनुषंगाने तहसील कार्यालय शेवगाव व आबासाहेब काकडे फार्मसी कॅम्पस बोधेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 222 शेवगाव विधानसभा मतदारसंघातील कॅम्पस ऍम्बेसिडरची बैठक व मतदार जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी याकरिता निबंध वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाकरिता अप्पर तहसीलदार राहुल गुरव, नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, सहा निवडणूक अधिकारी रमेश गोरे उपस्थित होते.यावेळी निवडणूक शाखेचे सहा अधिकारी रमेश गोरे यांनी आपल्या प्रस्ताविकात लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून तसेच आपल्या गावातील मित्र नातेवाईक व इतर सर्वांना या मतदानचे महत्व पटवून देऊन सर्वांना मतदानाचा हक्क बजावा असे प्रतिपादन केले. यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालय विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावा मतदार निवडणूक प्रक्रियेतील कामकाज तसेच निवडणूक संदर्भातील निवडणूक आयोग भारत सरकार यांनी केलेले विविध प्स व त्याचा वापर याविषयी सखोल असे मार्गदर्शन राहुल गुरव यांनी केले तर राजेंद्र बकरे यांनी 75 टक्के पेक्षा जास्त मतदान व्हायला हवे व निरपेक्षित लोकशाही पद्धतीने मतदान व्हायला हवे असे मत व्यक्त केले व मतदाराची प्रतिज्ञा त्यांनी उपस्तित सर्व मान्यवरांसमवेत सर्व विद्यार्थ्यांना दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत गांगुर्डे यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे मतदान नोंदणी प्रक्रियेचे कामकाज पूर्ण झालेले आहे व लोकशाही पद्धतीने मतदान व्हायला हवे याकरिता आपण सर्वांनी सहकार्य करावे असे मत मांडले.यावेळी राबविण्यात आलेल्या वकृत्व व निबंध स्पर्धेत महाविद्यालयातील बहुतांशी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला यामध्ये वकृत्व स्पर्धे करता कु.मिर्झा सानिया समीर बेग यांनी प्रथम क्रमांक, कु.मार्गे ऋतुजा यांनी द्वितीय क्रमांक तर दराडे कृष्णा यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला तसेच निबंध स्पर्धेत कु. गर्जे आरती प्रथम क्रमांक कु. धस स्वाती द्वितीय क्रमांक, दराडे स्वाती तृतीय क्रमांक प्राप्त केले सर्व विद्यार्थ्यांना महसूल विभागामार्फत बक्षीस देण्यात येईल.या प्रक्रिये करीता परीक्षक म्हणून नांगरे अश्विनी, आहेर पूजा, असिफ शेख, यांनी कामकाज पाहिले तर प्राध्यापिका जयश्री कोकाटे यांनी आभार मानले.
COMMENTS