Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड

रोमीओ तरुणावर गुन्हा दाखल

संगमनेर/प्रतिनिधी ः शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणार्‍या 21 वर्षीय तरुणीचा सातत्याने पाठलाग करत गुरुवारी सकाळी भर रस्त्यात तिचा हात पकडत

Kopardi Rape And Murder Case : कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणाची सुनावणी तहकूब
लोकसहभागातून स्वतंत्र विलिनीकरण केंद्र कोरोना नियंत्रणासाठी वरदान ठरतील-घोडके
मराठी पत्रकार परिषदेच्या संगमनेर तालुकाध्यक्षपदी शाम तिवारी

संगमनेर/प्रतिनिधी ः शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणार्‍या 21 वर्षीय तरुणीचा सातत्याने पाठलाग करत गुरुवारी सकाळी भर रस्त्यात तिचा हात पकडत ‘मैं तुझसे प्यार करता हूं’ असे म्हणत तिने विरोध करताच तिला मारहाण व छेडछाड करणार्‍या रोमीओ तरुणावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात रोमीओ आरोपी फरहान सय्यद याच्या विरोधात पीडित तरुणीने तक्रार दिली आहे. शहरात भर वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे गेल्या काही दिवसांपासून कुठेही दिसत नसलेले शहर पोलिसांचे दामिनी पथक पुन्हा कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे. संबंधित तरुणी एम.एस.सीचे शिक्षण घेत असून गेल्या महिनाभरापासून शहरातीलच फरहान सय्यद नावाचा तरुण तिचा वारंवार पाठलाग करत तिला त्रास देत होता. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही तरुणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून बस स्थानकाकडे पायी जात असताना फरहान सय्यदने तिला भर रस्त्यात अडविले. ’ये रुक, मुझे तेरे से बात करनी है, मै तुझसे प्यार करता हु,’ असे म्हणत त्याने तेथेच तिचा हात देखील पकडला. त्यामुळे तिने त्याला विरोध करत ’मुझे तेरे साथ कोई बात नही करनी,’ असे सांगतात त्याने तिला भररस्त्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तुझे कोणाशी अफेअर आहे, याची माहिती आहे, असे सांगत तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने घरी जात याची माहिती वडिलांना दिली. आणि त्यानंतर वडिलांसह पीडित तरुणीने पोलीस स्टेशन गाठून फरहान सय्यद याच्या विरोधात तक्रार दाखल केली. फरहान सय्यद याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354 (ड) (1), 323, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

COMMENTS