नवी दिल्ली : जोशीमठमधील जमिनीला गेल्या काही दिवसांत वेगाने खचत असल्याचे इस्रोच्या सॅटेलाईट पाहणीतून समोर आले आहे. त्यानंतर आता पर्यटकांसाठी विशेष
नवी दिल्ली : जोशीमठमधील जमिनीला गेल्या काही दिवसांत वेगाने खचत असल्याचे इस्रोच्या सॅटेलाईट पाहणीतून समोर आले आहे. त्यानंतर आता पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आणि डोंगरावर वसलेले नैनिताल, शिमला, चंपावत, उत्तरकाशी आदी ठिकाणांसह समुद्राच्या काठावर वसलेली शहरेही बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामागे मानवाकडून केली जाणार्या विविध कृत्यांमुळे पृथ्वीचे तापमान वाढते आहे आणि हवामान बदलांचा परिणाम मानवी आयुष्यावर होताना दिसत आहे. जर याविषयी पावले उचलली नाही, तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल, असा इशारा इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरने एक संशोधन अहवालातून जारी केला आहे.
इस्रो स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे शास्त्रज्ञ रतीश रामकृष्णन आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून हा शोधनिबंध प्रसिध्द केला आहे. या शोधनिबंधाचे नाव ’शोरलाइन चेंज अॅटलस ऑफ द इंडियन कोस्ट – गुजरात-दीव आणि दमण’ असे आहे. यामध्ये अहमदाबादसह गुजरातचे अनेक किनारी भाग समुद्राच्या धुपामुळे बुडतील. गुजरातचा 1052 किलोमीटर लांबीचा किनारा स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, 110 किलोमीटरचा किनारा कापला जात आहे. 49 किमीच्या किनारपट्टीवर हे अधिक वेगाने होत असल्याचे म्हटले आहे. गाळामुळे गुजरातमध्ये 208 हेक्टर जमीन वाढली आहे. पण गुजरातची 313 हेक्टर जमीन समुद्राच्या धुपामुळे नष्ट झाली आहे. याचा परिणाम भविष्यात भयानक दुष्काळ होतील, समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी-प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाचे प्रमाण वाढलं असून, परिणामी तापमानातही वाढ झाली आहे. म्हणजेच जेव्हा माणूस निसर्गाच्या कामात अडथळा आणतो, तेव्हा पर्यावरणाचा र्हास होण्यास सुरुवात होत असते.
कृणाल पटेल आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या अभ्यासात गुजरातच्या 42 वर्षांच्या भौगोलिक इतिहासाचा अभ्यास करण्यात आला आहे. कच्छ जिल्ह्यात सर्वाधिक समुद्राची धूप झाली आहे. सर्वाधिक म्हणजे 45.9 टक्के जमिनीची धूप झाली आहे. गुजरातची चार जोखीम क्षेत्रात विभागणी केली होती. 785 किमी किनारपट्टीचे क्षेत्र उच्च जोखीम क्षेत्रात आणि 934 किमी क्षेत्र मध्यम ते कमी जोखीम श्रेणीमध्ये आहे. ही क्षेत्रे धोक्याच्या क्षेत्रात आहेत. कारण, येथे समुद्राच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.
COMMENTS