सीएनजी अडीच रुपयांनी महागला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीएनजी अडीच रुपयांनी महागला

नवी दिल्ली : देशात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत असतांना अनेक जण सीएनजी गॅस वापरत होते. मात्र त्यात देखील वाढ होतांना दिसून येत असून, सोमवारी सीएनजी

बेशिस्त-बेदरकारपणे वाहन चालविणार्‍यांवर कडक कारवाई करा : ना. देसाई
जम्मू-काश्मीरमध्ये 5 जवानांना वीरमरण
विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे 25 उमेदवार ठरले ?

नवी दिल्ली : देशात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत असतांना अनेक जण सीएनजी गॅस वापरत होते. मात्र त्यात देखील वाढ होतांना दिसून येत असून, सोमवारी सीएनजी गॅसमध्ये अडीच रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत सीएनजीचे नवीन दर प्रति किलोमागे 64.11 रुपये झाले आहेत. विशेष म्हणजे, शुक्रवारी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडकडून देशांतर्गत पीएनजी आणि सीएनजी गॅसच्या किंमती वाढविण्यात आल्या होत्या. सीएनजी दरात 80 पैसे तर, पीएनजी दरात 5.85 रुपये प्रति घनमीटर म्हणजे 16.5 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.यापूर्वी 24 मार्चला देखील पीएनजी दर 1 रुपयांनी वाढविण्यात आले होते. गेल्या महिन्याभरात उछॠ आणि पीएनजी दरात सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे. नवीन दरवाढीनंतर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नोएडात सीएनजी 66.88 रुपये आणि मुजफ्फरनगर, मेरठमध्ये 71.36 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

COMMENTS