Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये ढगफुटी

सिंधुदुर्ग: राज्यातून मॉन्सून माघारी घेत आहे. असे असले तरी कोकणात पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यांला चांगलेच झ

किनगाव बसस्थानकात पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय
मुक्रमाबाद येथे काँग्रेसचे जेलभरो आंदोलन
खरीप हंगाम शेतकर्‍यांच्या हिताचा होण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन-पालकमंत्री

सिंधुदुर्ग: राज्यातून मॉन्सून माघारी घेत आहे. असे असले तरी कोकणात पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यांला चांगलेच झोडपले. कुडाळ तालुक्यातील नारूर गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नदीला मोठा पूर आला असून यामुळे येथील एक पूल वाहून गेला. राज्यात आणि देशात बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला आहे. मॉन्सून त्याच्या परतीच्या प्रवासाला लागला आहे. मात्र, मुंबई, ठाणे, पालघर, तसेच कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. यह जिल्ह्यात हलका ते माध्यम पाऊस होण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. दरम्यान, गुरुवारी देखील कोकणात पावसाचा जोर कायम होता. सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग तालुक्यात झाला. काल झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला. सर्वाधिक पावसाचा फटका हा कुडाळ तालुक्याला बसला. येथील, नारूर गावात ढगफूटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे महालक्ष्मी मंदिर ते रांगणा गडापर्यंत जाणार्‍या रस्त्यावरील पुलाचा काही भाग कोसळला. काही अवधीतच नदीला आलेल्या पुराचे पाणी या पूलावरून वाहू लागले होते.

COMMENTS