Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ

अमृत उद्योग समूहातील सेवानिवृत्त कर्मचारी संघ कार्यालयाचे उद्घाटन

संगमनेर ः काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाह

गोदावरी कालव्यातून तीन आवर्तने सोडण्यात येतील  – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
विक्रमी ऊस उत्पादन देणारे सर्व वाण राहुरी कृषि विद्यापीठाचे
मंत्र्यांवर आंदोलनाची वेळ, हे दुर्दैव ; प्रा. शिंदे यांची महाविकास आघाडीवर टीका ; 26 जूनला चक्का जाम जाहीर

संगमनेर ः काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023- 24 या गळीत हंगामाचा सांगता समारंभ रविवार 21 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वा. आमदार बाळासाहेब थोरात व सौ कांचनताई थोरात, माजी आ. डॉ. सुधीर तांबे व चेअरमन प्रतापराव ओहोळ यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा. चेअरमन संतोष हासे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना हासे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने ऊस उत्पादक सभासद शेतकरी व कामगारांचे हित जपताना उच्चांकी भाव दिला आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना 10 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त गाळप करून कारखान्याने एक उच्चांकी टप्पा पार केला आहे. यावर्षीच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ व अमृत उद्योग समूहातील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी संघ कार्यालयाचे उद्घाटन रविवार दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वा. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई थोरात यांच्या शुभहस्ते माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी आमदार सत्यजित तांबे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, बाजीराव पा. खेमनर, सुधाकर जोशी, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, लक्ष्मणराव कुटे, शंकर पा. खेमनर, इंद्रजीत भाऊ थोरात, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, मिलिंद कानवडे, सोमेश्‍वर दिवटे, अर्चना बालोडे यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी सर्व शेतकरी ऊस उत्पादक सभासद व सेवा निवृत्त कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व सर्व संचालक मंडळांने केले आहे

COMMENTS