Homeताज्या बातम्यासंपादकीय

रिलायन्सची चलाखी !

अगदी गाजावाजा करत मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे थेट लाईव्ह करत, विविध योजनांची घोषणा केली. देशात स्वदेशीचा नार

राजकीय भूमिकेतील ईव्हीएम !
शब्द बंदी तरीही खडाजंगी !
ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर! 

अगदी गाजावाजा करत मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे थेट लाईव्ह करत, विविध योजनांची घोषणा केली. देशात स्वदेशीचा नारा पुन्हा एकदा लावण्याचा याच प्रसंगी नीता अंबानी यांनी थेट घोषणा केली. कश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत आणि सिक्कीम पासून ते भूजपर्यंत, देशात पूर्णपणे स्वदेशी चे ग्लोबल निर्माण केले जाईल, अशा पद्धतीने त्यांनी आपले विचार मांडले. मात्र, तत्पूर्वी मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना ग्राहकांसाठी नेमकं काय आणलं जाईल, याची उद्घोषणा केली. वास्तविक, मुकेश अंबानी यांनी नेहमीच मोफत चा नारा देऊन ग्राहकांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळाल्यावर, त्यांना मग हळूहळू त्या योजनांच्या महागाईकडे नेण्याचे सूत्र अवलंबलं आहे! त्यांनी रिलायन्स मोबाईल जेव्हा लाँच केला, तेव्हा, सुरुवातीला अगदी मोफत दिलेला मोबाईल नंतर मग वाढवत वाढवत, आज रिलायन्सचा मासिक जीबी डेटा, हा सर्वात महागडा ठरला आहे. यावेळी पुन्हा त्यांनी आर्टिफिशियल इंटलिजन्स हे प्रत्येक क्षेत्रात आता रिलायन्स कडून आणले जाईल आणि त्यामध्ये त्यांनी मखलाशी अशी केली आहे की, हे सगळं ग्राहकांच्या सेवेसाठी आहे. मात्र, ग्राहकांचा जो डेटा जिथे अपलोड होतो, तो डेटा आज जागतिक स्पर्धेचा प्रमुख आधारस्तंभ बनला आहे. याचा अर्थ एआय फीचर्स मोफत देण्याची घोषणा करताना, लोकांचा महत्त्वपूर्ण डेटा गोळा करण्याची चलाखी मुकेश अंबानी यांनी यावेळी केलेली आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे आज जगातला सर्वात मोठा डेटा असल्याचे मानले जाते.  जागतिक व्यावसायिक स्पर्धा असू द्या अथवा राजकीय स्पर्धा, संपूर्ण डेटाबेस झालेले आहे.

कारण, डेटावरून प्रत्येक व्यक्तीची आवड निवड, माहिती आणि त्या व्यक्तीचा वैचारिक कलही कळतो. त्यामुळे, अशा व्यक्तींना कोणत्या प्रलोभनाद्वारे आपण आपल्याकडे वळवू शकतो, याची एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनते. ती स्ट्रॅटेजी आज राजकारण, व्यवसाय आणि एकंदरीत संघटनात्मक पातळीवर महत्त्वपूर्ण ठरते आहे. या गोष्टींचा जिओचे मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या माध्यमातून जिओ मध्ये काय आणलं जाईल, या सगळ्या घोषणा केल्या असल्या तरी, रिलायन्स यांची ही घोषणा भारतीय स्पर्धा आयोगाच्या ७० हजार ३५० कोटी रुपयांचं जे मर्जर वाल्ट डिस्ने बरोबर झाले, त्याच्या एक दिवसानंतर, रिलायन्सचे मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली आहे. अर्थात, या ठिकाणी भारतीय स्पर्धा आयोगाचा ही संबंध येत असल्यामुळे, याची भारतीय लोकांच्या माध्यमातून निश्चितपणे छाननी किंवा परीक्षण व्हावे! तो भारतीय नागरिकांचा नागरिक म्हणून अधिकार आहे. तो नाकारला जाऊ शकत नाही. कारण, आतापर्यंत भारतीय नागरिकांची ग्राहक म्हणून मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट संस्थांनी फसवणूकच केलेली आहे. या फसवणुकीत पुन्हा भारतीय नागरिक सापडू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाला सजग राहावं लागेल. रिलायन्स दर दिवशी लोकांच्या सेवेसाठी आपण प्रोडक्शन आणत असल्याचे जाहीर करते; परंतु, प्रत्यक्षात लोकांच्या खिशातून मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर काढण्याची युक्ती रिलायन्स नेहमी वापरत असते. या युक्तीमध्येच रिलायन्स सरकार, नागरिक आणि बँका या सगळ्यांकडून पैसा काढून घेण्याचं, एक सूत्रबद्ध धोरण अवलंबत असतं. त्यामुळे, रिलायन्सच्या कितीही मोठ्या घोषणा असल्या आणि त्या मीडियाने फार वाढवून सांगितल्या असल्या तरी, रिलायन्सच्या एकूणच प्लॅन ची नागरिकांच्या आणि खासकरून ग्राहकांच्या दृष्टीने छाननी होऊन कुवा त्याचे ऑडिट होणं हे फार महत्त्वाचे आहे!

COMMENTS