मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक आणि करसहाय्यक पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक आणि करसहाय्यक पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. लिपिक टंकलेखक भरती मराठी भाषेतून लातूर जिल्ह्यातील सूरज फडणीस या उमेदवाराने राज्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर इंग्रजी संवर्गातून कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक वाजरेकर या तरुणाने बाजी मारली आहे.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम शिफारस यादी घोषित करण्यात आली असून त्यात लातूर, चंद्रपूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि मुंबईतील बहुतांश उमेदवारांनी यश मिळवल्याची माहिती आहे. त्यामुळे आता लिपिक टंकलेखक परिक्षेत यश मिळवलेल्या उमेदवारांचे अनेकांनी अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लिपिक टंकलेखक परिक्षेत महिला संवर्गात राधिका गोल्हार आणि ज्योती काटे यांनी राज्यातून संयुक्तरित्या पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून लिपीक टंकलेखक पदासाठी 1178 उमेदवारांची शिफारस यादी राज्य सरकारकडे घोषित करण्यात आली आहे. लिपीक टंकलेखक परिक्षेसह कर सहायक संवर्गाचाही निकाल एमपीएससीकडून जाहीर करण्यात आली आहे. या परिक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील राहुल विजय जेंगठे या उमेदवाराने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर महिला संवर्गातून अहमदनगर जिल्ह्यातील रिंकल हाडके हिने बाजी मारली आहे. त्यामुळं आता राज्यातील अनेक शहरांमध्ये एमपीएससीच्या उमेदवारांकडून जल्लोष करण्यात येत आहे. कर सहायक संवर्गाचाही निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर एमपीएससीकडून तब्बल 225 उमेदवारांची निवडीसाठी राज्य सरकारकडे शिफारस केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांना क्रमवारीसह त्यांचा अंतिम निकाल एमपीएससीच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे. याशिवाय उमेदवारांना गुणांची पडताळणी करण्यासाठी देखील वेगळी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं आता पुणे, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, मुंबई आणि औरंगाबाद या शहरांमध्ये यशस्वी उमेदवारांकडून जल्लोष करण्यात येत आहे.
COMMENTS