परिसर स्वच्छ ठेवून सहकार्य करा-नगराध्यक्ष दंडवेभोकर । प्रतिनिधीनगरपरिषद व आरोग्य स्वच्छता समितीच्या वतीने मंगळवारी शहरात स्वच्छता पंधरवडा अभियान

परिसर स्वच्छ ठेवून सहकार्य करा-नगराध्यक्ष दंडवे
भोकर । प्रतिनिधी
नगरपरिषद व आरोग्य स्वच्छता समितीच्या वतीने मंगळवारी शहरात स्वच्छता पंधरवडा अभियान राबविण्यात आले शहरातील प्रत्येक भागाच्या रस्ते , नाली , जागोजागी साठवलेला कचरा यांची साफसफाई करून येत्या पंधरा दिवसात शहर स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन नवनिर्वाचित नगराध्यक्ष भगवानराव दंडवे यांनी केले आहे.
या स्वच्छता अभियानाची सुरुवात दि. 3 फेब्रवारी रोजी सकाळी 9 वाजता शहरातील लहुजी चौकातून नगराध्यक्ष भगवानराव दंडवे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप सोनवाडे, मुख्याधिकारी ऋषभ पवार,आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती प्रतिनिधी डॉ. फिरोज इनामदार , बांधकाम सभापती योगेश देशपांडे, महिला व बालकल्याण सभापती प्रतिनिधी डॉ.मनोज गिमेकर, उपसभापती प्रतिनिधी दिनेश लक्षटवार, नगरसेवक प्रतिनिधी शेख युसूफ, सना इनामदार,गौतम कसबे,सिद्धेश्वर पिटलेवाड, गंगाधर पवार, अभियंता सुशिल खिल्लारे,जावेद इनामदार, साहेबराव मोरे,दिलीप वाघमारे ,अशोक डोंगरे,यांच्यासह नगर परिषदेचे सर्व कर्मचारी , सफाई महिला कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छता अभियानामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे .

COMMENTS