Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळवण मार्फत स्वच्छता अभियान संपन्न

नाशिक - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छता हीच सेवा अभियान देशभरात राबविण्यात आले. त्या अनुषंगाने रविवार 1 ऑक्टोबर 2023 रोजी

LPG गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ
हादगाव- निवघ्यातील अवैध धंद्यांना अभय कोणाचे ?
काँगे्रसची दिशा आणि दशा !

नाशिक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छता हीच सेवा अभियान देशभरात राबविण्यात आले. त्या अनुषंगाने रविवार 1 ऑक्टोबर 2023 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळवण मार्फत ‘एक तारीख -एक तास’ स्वच्छता अभियान  कळवण बस स्टँण्ड येथे सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत राबविण्यात आले. अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळवणचे प्राचार्य सतिष भामरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात संस्थेतील 242 प्रशिक्षणार्थ्यांनी  सहभाग नोंदविला. यावेळी नगराध्यक्ष कौतिक पगार, कळवण बस आगारचे व्यवस्थापक श्री. बेलदार, श्री. बोरसे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री.पवार, कळवण बाजार समितीचे सभापती धनजंय पवार उपस्थित होते. या मोहिमे दरम्यान कळवण आगार परिसरातील प्रवाशांची बैठक व्यवस्था व परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत आगारातील कर्मचारी, प्रवासी यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला.

धोडप किल्ल्यावर राबविण्यात आली स्वच्छता मोहिम – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त रविवार 2 ऑक्टोबर 2023 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळवण यांच्यावतीने धोडप किल्ल्यावर  60 प्रशिक्षणार्थी व 18 कर्मचारी यांच्यामार्फत सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.15 या वेळेत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

या स्वच्छता अभियानात प्रशिक्षणार्थ्यांनी 5 गारबेज बँग्ज भरून प्लॉस्टीक बॉटल्स, कचरा, रॅपर्स संकलित केले. पाण्याच्या टाकीजवळील असणाऱ्या झाडे- झुडपांची छाटणी केली. कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी 65 आंब्याच्या बियाचे रोपण केले. या मोहिमेत माऊंट ऐवरेस्ट सर  करणारे प्रसिद्ध गिर्यारोहक चेतन केतकर  व त्यांच्या टिमने प्रशिक्षणार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना गिर्यारोहणाबद्दल मार्गदर्शन केले. दोन्ही स्वच्छता मोहिम यशस्वीतेसाठी संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अनंत जाधव, गटनिदेशक श्री. विभांडीक, श्री. बेडसे, श्री. कट्यारे तसेच सर्व शिल्पनिदेशक, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांनी अथक प्रयत्न केले. असेही प्राचार्य सतिष भामरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

COMMENTS