Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून वाईच्या गणपती घाटावर स्वच्छता मोहीम

वाई / प्रतिनिधी : खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी आपल्या समर्थकांसह येथील गणपती घाटावर स्वच्छता मोहिम राबविली. या प्रसंगी महागणपतीची आरती

प्रतापगड कारखान्याच्या 21 जागांसाठी 83 उमेवारांचे अर्ज दाखल
भारतात सात कोटी सत्तर लाख मधुमेही
सातार्‍यात सापडली गुप्त होणारी मानवी कवटी; जिल्हा रुग्णालयातील अधिकार्‍यांना डोकेदुखी

वाई / प्रतिनिधी : खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी आपल्या समर्थकांसह येथील गणपती घाटावर स्वच्छता मोहिम राबविली. या प्रसंगी महागणपतीची आरती करण्यात आली. या निमित्ताने साक्षात श्री गणेशाची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला लाभले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार मदन भोसले व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महासोहळा साजरा होत आहेत. यावेळी देशाच्या विविध भागांत व मंदिरात स्वच्छता अभियान राबवावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्याप्रमाणे वाईच्या गणपती घाटावर खा. उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी आपल्या समर्थकांसह स्वच्छता मोहिम राबविली.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभीताई भोसले, जिल्हा उपाध्यक्ष अजय मांढरे व रोहिदास पिसाळ, तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, शहराध्यक्ष विजय ढेकाणे, महाबळेश्‍वर तालुकाध्यक्ष अनिल भिलारे, प्रतापगड उत्सव समितीच्या विजयाताई भोसले, बाजार समितीचे संचालक विवेक भोसले, ग्रामोद्योग आघाडीचे सचिन घाटगे, ज्येष्ठ कार्यकर्ते काशिनाथ शेलार, अजित वनारसे, तेजस जमदाडे, भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सातारचे सुनील काटकर, काका धुमाळ, गीतांजली कदम, रंजना रावत, विनीत पाटील, पंकज चव्हाण या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, मंडल अधिकारी, पालिका आरोग्य निरीक्षक सागर सरतापे तसेच पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्यानंतर खा. उदयनराजे भोसले यांनी भाजपाचे शहराध्यक्ष विजय ढेकाणे यांच्या घराच्या भिंतीवर कमळाचे चित्र रेखाटले. यावेळी शहर परिसरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS