Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावरून महायुतीतील नेत्यांत खडाजंगी

मंत्री रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्यात जुंपली

मुंबई : महायुतीतील नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. थेट थोबाड फोडण्याची भाषेमुळे महायुतीतील वातावरण ढवळून निघाले आह

22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार | LOK News 24
जागरूक करणार कर न भरण्याचे आंदोलन ; मनपाला 10 कलमी मागण्या निवेदन
निवडणूक प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी हे आयोगाचे वैशिष्ट्य : मुख्य निवडणूक आयुक्त

मुंबई : महायुतीतील नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. थेट थोबाड फोडण्याची भाषेमुळे महायुतीतील वातावरण ढवळून निघाले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे महायुतीतील वाद थेट मुद्यावरून गुद्यावर पोहोचला.
प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षांनी संपला, पण मुंबई-गोवा महामार्ग 14 वर्षांतही झाला नाही हे दुःखदायी आहे. केवळ पाहणी दौरे कशासाठी करायचे? त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणार्‍या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दांत शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सोमवारी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेनंतर चव्हाण यांनी थेट रामदास कदम यांचे थोबाड फोडण्याची भाषा केली. यामुळे सत्ताधारी महायुतीतील राजकीय द्वंद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. रामदास कदम पुढे म्हणाले की, कोकणात महायुतीला कोणताच अडथळा येणार नाही; पण दापोली विधानसभेवरून मिठाचा खडा टाकण्याचे काम भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून होत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी या वेळी केला. 2019 मध्ये युती असतानाही भाजपने योगेश कदमला मतदान केले नाही. आता योगेश कदमला तर बदनाम करण्याचे काम सुरू आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांसह सर्वांकडे पत्रव्यवहार केला आहे. तुमच्यावर विश्‍वास ठेवून आम्ही आलो आहोत, तरी दापोलीच्या भाजप पदाधिकार्‍यांचे कारस्थान कसे आहे, याविषयी त्यात सविस्तर लिहिले आहे. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. अर्थात महायुतीतल वाद नवे नसले तरी, रामदास कदमांची वाद करण्याची हि काही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या मुद्यावरून, तर कधी विकास कामांच्या मुद्यावरून रामदास कदमांनी भाजपला लक्ष्य केलंय. यापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दापोली दौरा रामदास कदम यांच्या चांगला जिव्हारी लागला होता. आपला मुलगा योगेश कदम यांच्या मतदारसंघात येऊन भाजपच्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी परस्पर विरोधी काम केल्याचा आरोप रामदास कदम यांनी लगावला होता. लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून कोकणात शिंदेंच्या शिवसेनेला जागा न सोडल्यामुळे रामदास कदम यांनी थेट नाराजी व्यक्त करत भाजपावर जोरदार टीका केली होती. प्रादेशिक पक्ष संपवून फक्त भाजपलाच मोठे व्हायचं आहे का? असा सवाल त्यांनी भाजपला केला होता. 2009 सालात गुहागरचे भाजपचे बंडखोर उमेदवार विनय नातू यांच्यामुळे झालेला पराभव रामदास कदम यांच्या आजही लक्षात आहे. तर त्यामुळेच रामदास कदम आणि विनय नातू यांच्यातला स्थानिक स्तरावरचा संघर्ष वारंवार पहायला मिळाला आहे.

रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री ः रामदास कदम – प्रभू रामाचा 14 वर्षांचा वनवास संपला पण  पण मुंबई – गोवा महामार्ग 14 वर्षांतही झाला नाही हे दुःखदायी आहे. केवळ पाहणी दौरे कशासाठी करायचे? त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणार्‍या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दांत शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सोमवारी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.

सांभाळून बोला नाही तर तोंड फोडू ः चव्हाण – शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या टीकेनंतर मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील संतापले आहेत. ते म्हणाले की, बोलायला मलासुद्धा येते. कधीतरी रस्त्यात समोरासमोर या.. अशा भाषेत मला बोलता येते ना, कोणी वाचवायला देखील राहणार नाही. रवींद्र चव्हाण आहे मी, थेट उत्तर देऊ शकतो, पण युतीधर्म पाळतोय त्याचा अर्थ असा नाही की कोणीही काहीही बोलेल आणि आम्ही ऐकून घेऊ, असे होणार नाही. एक लक्षात ठेवा, तोंड सांभाळून बोलायचे नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांना इशारा दिला आहे.

मोठया नेत्यांनी सांभाळून बोलावे ः फडणवीस – महायुतीतील नेत्यांच्या खडाजंगीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मोठ्या नेत्यांनी सांभाळून बोलावे, असा इशाराच फडणवीस यांनी दिला आहे. अशाप्रकारे आरोप करणे हा कोणता युतीधर्म आहे? असा प्रतिप्रश्‍न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. अशा प्रकारे माध्यमांसमोर आरोप करणे हे चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांचे काही म्हणणे असेल तर त्यांनी ते युतीमध्ये मांडावे. रामदास कदम यांचे जे म्हणणे असेल ते आम्ही समजून घेऊ, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांना सुनावले आहे. रामदास कदम हे वारंवार टोकाचे बोलतात. त्यामुळे आमच्या देखील भावना दुखावल्या जातात. आम्ही देखील माणसे आहोत. वारंवार भारतीय जनता पक्षाला बोलणे, हे आम्हाला मान्य नाही. यासंदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

COMMENTS