श्रीगोंदा : अहमदनगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा मांडवगण ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्य
श्रीगोंदा : अहमदनगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा मांडवगण ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने खासदार लंके यांची वही तुला करून या वह्यांचे मांडवगण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राहुल जगताप यांनी बोलताना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले.
खासदार निलेश लंके यांनी साकळाईच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले.यावेळी मांडवगण ग्रामस्थांच्या वतीने गावामध्ये नॅशनल बँक आणि ग्रामीण रुग्णालयासाठी खासदार निलेश लंके यांना निवेदन देण्यात आले. दोन्ही प्रश्न तात्काळ मार्गी लावणार असल्याचे खा.लंके यांनी सांगितले. कार्यक्रमाला विशेष उपस्थित डॉ. सेलचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब कावरे, खादी ग्रामउद्योग चे संचालक अमित जाधव यांचा यावेळी निलेश लंके प्रतिष्ठान मांडवगण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन संग्राम देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठानचे सिद्धार्थ घोडके, योगेश देशमुख, माऊली कण्हेरकर, शिवाजी वाघमारे, टिल्लू मनसुके, पप्पू बोरुडे, स्वाधीन मोटे यांनी मोलाचे सहकार्य केले.
COMMENTS