Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबासाहेब शेलार यांचा नागरी सत्कार

समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव

बेलापूर ः सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या बेलापुर खुर्द येथील प्रा. बाबासाहेब शेलार यानी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याची दखल शासन

राज्यात कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट; सलग दुसर्‍या दिवशी 41 हजाराच्यावर कोरोना रुग्ण आढळले
कारणे देवू नका, कामे तातडीने पूर्ण करा ; आ.आशुतोष काळेंची ठेकेदार अधिकार्‍यांना तंबी
एकपात्री अभिनय स्पर्धेत श्रद्धा पुंडे व्दितीय

बेलापूर ः सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या बेलापुर खुर्द येथील प्रा. बाबासाहेब शेलार यानी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याची दखल शासनाने घेवुन त्यांना डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला, ही बेलापुरकराच्या नव्हे श्रीरामपूर तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे गौरोद्ग़ार अरुण पा. नाईक यांनी काढले.  
                         सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रा. बाबासाहेब शेलार  यांना नुकताच प्रदान करण्यात आला. त्याबद्दल प्रा. शेलार  यांचा ग्रामपंचायत बेलापूर विविध सामाजिक संघटना बेलापुर ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला होता .त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन नाईक बोलत होते या वेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच  अँड दीपक बारहाते, करण दादा ससाने द्वारकनाथ बडधे बापुसाहेब पुजारी प्राचार्य काळूराम बोर्डे विजय शेलार सुभाष त्रिभुवन उपस्थित होते. या वेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. बाबासाहेब शेलार म्हणाले की मला आतिशय गरीब परिस्थीतून शिक्षण घ्यावे लागले गरीबीचे चटके सहन करतानाच गावातील काही समाज कार्य करणार्‍या समाजसेवकाशी संपर्क आला अन समाजसेवेचे खुळ डोक्यात शिरले समाजसेवेतुन मिळणार्‍या  आनंदाचे मोलच होवु शकत नाही. मी कधीच अपेक्षा ठेवुन कुठलेही सामाजिक काम केले नाही आपल्या सर्वाच्या आशिर्वादामुळे मला महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला हा माझ्या आयुष्यातील सर्वात अनमोल दागीना असून या पुढेही माझे कार्य असेच सुरु ठेवणार असल्याचे शेलार म्हणाले. यावेळी  या वेळी प्रशांत होन  गोरख भगत प्रा. तुकाराम सोळसे  प्राचार्य काळूराम बोरुडे, विश्‍वनाथ आल्हाट  उत्तमराव शेलार रवि शेलार, विजय शेलार  माजी उपसरपंच शरद पुजारी संदेश विसपुते विलास  भालेराव, मधुकर पुजारी ना. म. साठे, कार्याध्यक्ष,  बहुजन रयत परिषद  प्रभाकर क्षीरसागर भगवानराव जगताप दादू नेटके  संजय शेलार,आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अरुण बोरुडे व संजयकुमार शिंदे यांनी केले. प्रास्ताविक जागृती प्रतिष्ठाणचे सचिव रविंद्र शेलार यांनी केले तर आभार प्रभाकर क्षिरसागर यांनी मानले.

COMMENTS