Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टेक्निशियन विना तीन कोटीची सिटीस्कॅन मशीन पडून राहणार?

किनवट तालुक्याच दुर्भाग्यच

किनवट प्रतिनिधी- महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजने अंतर्गत 3 कोटी 10 लाख रुपये सिटीस्कॅनसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याम

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला आघाडीकडून महिलादिन उत्साहात
अनन्या पांडेसोबत ब्रेकअप.
शाळा सुरु करण्याबाबत संभ्रम दूर व्हावा -बाबासाहेब बोडखे

किनवट प्रतिनिधी- महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजने अंतर्गत 3 कोटी 10 लाख रुपये सिटीस्कॅनसाठी निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे गोकूंदा उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन बसवण्यात आली आहे. तत्कालीन पालकमंत्री अशोकराव चव्हाणांच्या पुढाकारातून आणि जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर सिटीस्कॅनचा मार्ग मोकळा झाला. ट्रामा केअर सेंटरमध्ये मशिनची भर पडली परंतू तात्काळ तंत्रज्ञ नियुक्त केला तरच रुग्णांना त्याचा फायदा मिळेल. रुग्णांना यापुढे नांदेड किंवा आदिलाबाद जाण्याचा फेरा वाचला हे उल्लेखनिय म्हणता येईल.
 गोकूंदा येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित आहे. सिटीस्कॅन अभावी रुग्णांना नांदेड किंवा तेलंगणाच्या आदिलाबाद येथे जावे लागत होते. सिटीस्कॅन मशीनसाठी नेहमीच मागणी होत होती. तेंव्हा पालकमंत्री अशोकराव चव्हाणांनी विशेष लक्ष दिल्याने सिटीस्कॅन मशीनसाठी 3 कोटी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजने अंतर्गत ही तरतूद करण्यात आली. त्याच वेळी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी प्रशासकीय मान्यता व निधी वितरण आदेश दिले होते. त्यामुळे  सिटीस्कॅन मशीनचा मार्ग मोकळा झाला. ट्रामा केअर सेंटरमध्ये आता सिटीस्कॅनची भर पडल्याने रुग्णांना दिलासा मिळाला. नसत्या श्रेयवादाने सर्वांना आश्चर्याचे धक्यावर धक्याने परिसिमा पार केली आहे. परंतू प्रशासन स्तरावरुन सत्यता बाहेर येऊ लागली आहे. महाविकास आघाडीच्या काळातील मंजूर कामांना महायुतीच्या काळात सुरुवात झाल्याने श्रेयाची बेरीज होतांना दिसते.
सिटीस्कॅन टेक्निशियनची मागणी तालुकास्तरावरून करण्यात आली आहे परंतु अंमलबजावणीची प्रक्रिया ही जिल्हास्तरावरील प्रशासनाची असल्याने किमान एक महिना पद भरण्यास लागू शकेल.

COMMENTS