कर्जत : कर्जत नगरपंचायत हद्दीतील जोगेश्वरवाडी ( प्रभाग : 2) येथील केशरी कूपन धारक नागरिकांना स्वस्त धान्य दुकानाचा माल मिळावा, अशी मागणी प्रथम
कर्जत : कर्जत नगरपंचायत हद्दीतील जोगेश्वरवाडी ( प्रभाग : 2) येथील केशरी कूपन धारक नागरिकांना स्वस्त धान्य दुकानाचा माल मिळावा, अशी मागणी प्रथम नगरसेविका निता आजिनाथ कचरे यांनी केली आहे. तहसीलदार यांना निवेदन देवून त्यांनी ही मागणी केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे, जोगेश्वरवाडी येथील नागरीकांनी 4 ते 5 वर्षापासून रेशनकार्ड काढलेली आहेत. मात्र या रेशन कार्डधारक नागरिकांना अद्यापपर्यंत कोणतेही धान्य व माल मिळत नाही. त्यामुळे त्यांना या सवलतीपासून वंचित रहावे लागत आहे. यातील कित्येक लाभार्थी हे शेतकरी व शेतमजूर आहेत. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यांना चरितार्थ चालवणे जिकिरीचे झालेले आहे. या नागरिकांना माल मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी अन्यथा 18 मार्च पासून तहसीलदार कार्यालयासमोर लाभार्थ्यांसह उपोषण करण्यात येईल, असा इशारा कचरे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती विविध विभागांना देण्यात आल्या आहेत.
COMMENTS