जळगाव प्रतिनिधी - मोकाट कुत्र्यांची तालुक्यात दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने यात चोपडा शहरांसह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोकाट कुत्र्यांनी

जळगाव प्रतिनिधी – मोकाट कुत्र्यांची तालुक्यात दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने यात चोपडा शहरांसह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोकाट कुत्र्यांनी चावा घेण्याचे घटना घडत आहे. मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेले रुग्ण उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दररोज दोन ते तीन रुग्ण येत असल्याने त्यांना इंजेक्शन व जखमांवर ड्रेसिंग करण्यात येत आहे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या शाळा महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन सुरू आहे या ठिकाणी कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अशा ठिकाणी गर्दी करताना दिसत आहे कार्यक्रम पाहून घरी परत येत असताना. मोकाट कुत्र्यांच्या हवदोष ठिक ठिकाणी वाढलेले असल्याने कुत्र्यांचा चावा घेतलेचे प्रकार वाढताना दिसत आहे. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात असे रुग्ण बद्दल अधीक्षक डॉक्टर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दोन ते तीन रुग्ण येत असल्याने त्यांच्यावर योग्य ते उपचार केला जात असल्याचे सांगितले.
COMMENTS