विनायक मेटेंच्या अपघाताची सीआयडी चौकशी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनायक मेटेंच्या अपघाताची सीआयडी चौकशी

मुंबई: शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. या अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकां

उपांत्य फेरीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान बरोबर भारताचा नंबर लागणार ?
बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग तात्पुरता जागा
जायकवाडीच्या कालव्यांचे व्यवस्थापन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हावे – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई: शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. या अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. मेटे यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं? याची चौकशी करण्याची मागणी केली होती. अशातच आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. मेटे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी सुरू असतानाच त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात मायकर सांगतात की, ३ ऑगस्ट रोजी मेटे यांच्या गाडीचा रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो आणि पांढऱ्या रंगाच्या कारने शिक्रापूरजवळ (जि. पुणे) पाठलाग केला होता. वाहनात पाच ते सहा लोक बसलेले होते. मागे-पुढे गाडी करीत होते, तर टेम्पो हा आमच्या गाडीला पुढे जाऊ देत नव्हता, असा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय विविध पक्ष, संघटनांच्या नेत्यांनी देखील मेटे यांच्या अपघाती निधनामागे घातपात असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

COMMENTS