Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय नौदलाने चिनी खलाशाची केली सुटका

मुंबई ः भारतीय नौदलाने मुंबईपासून सुमारे 370 किमी अंतरावर समुद्रात तैनात असलेल्या बल्क कॅरियर झोंग शान मेनमधून जखमी चिनी खलाशाची सुटका केली. मुंब

कोपरगावकरांचा धारणगाव रस्त्याचा त्रास होणार कमी रस्त्याचे लवकरच काम सुरु होणार -आ. आशुतोष काळे
आपण सर्वजण काही प्रमाणात मनोरुग्ण ः राजन खान
सातारा जिल्ह्यातील पाच गुंड वर्षासाठी तडीपार

मुंबई ः भारतीय नौदलाने मुंबईपासून सुमारे 370 किमी अंतरावर समुद्रात तैनात असलेल्या बल्क कॅरियर झोंग शान मेनमधून जखमी चिनी खलाशाची सुटका केली. मुंबईच्या सागरी बचाव समन्वय केंद्राला मदतीसाठी कॉल आला, ज्यामध्ये जहाजावरील 51 वर्षीय खलाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. नाविकाचे बरेच रक्त वाहून गेले होते आणि वैद्यकीय कारणास्तव त्याला ताबडतोब जहाजातून बाहेर काढणे आवश्यक होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भारतीय नौदलाच्या हवाई स्टेशन आयएएन शकिरा येथून हेलिकॉप्टर सोडण्यात आले. हे ऑपरेशन एमआरसीसी मुंबई आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे केले होते.

COMMENTS