Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्नेहसंमेलनामधून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो ः अनिता उगले

कोपरगाव प्रतिनिधी ः मुलांवर लहान वयात झालेले संस्कार चिरकाल टिकत असतात. प्राथमिक शाळा मुलांच्या विकासाचा केंद्रबिंदु असुन वार्षीक स्नेहसंमेलनामधु

साकतला बायोडिझेलचा साठा जप्त
परकीय आक्रमणे रोखण्यासाठी सज्ज रहावे ः गोविंद जाटदेवळेकर
अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे ः विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी ः मुलांवर लहान वयात झालेले संस्कार चिरकाल टिकत असतात. प्राथमिक शाळा मुलांच्या विकासाचा केंद्रबिंदु असुन वार्षीक स्नेहसंमेलनामधुन त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो असे प्रतिपादन सरपंच अनिता किरण उगले यांनी केले. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे व बडदेवस्ती मळेगांवथडी येथील बालवाडी ते इयत्ता चौथीपर्यंतच्या मुला मुलींचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले त्याप्रसंगी अध्यक्षपदावरून उगले बोलत होत्या.
प्रारंभी उपसरपंच मुकेश चंद्रे व स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष किरण शिवाजी उगले, उपाध्यक्ष सुनिल दवंगे यांनी शाळेच्या वार्षीक प्रगतीचा अहवाल सादर केला. मुख्याध्यापिका जया मारूती खैरे यांनी गुणगौरव सोहळयातील मुला मुलींना बक्षिस वितरण केले. याप्रसंगी मळेगांवथडी ग्रामपंचायतीचे सदस्य सर्वश्री. जयश्री दवंगे, बाबासाहेब रामदास खोंड, सारिका अमोल दवंगे, विजय खोंड, सुमनबाई मोरे, मंदाबाई बबनराव राजगुरू, सयाजी मोरे, सोमनाथ जाधव, बाबासाहेब शिंदे, भाजपा तालुका उपाध्यक्ष डॉ. राजकुमार दवंगे, भाजपा ग्रामिण उपाध्यक्ष सुधाकर चंद्रे, मळेगांवथडी सोसायटीचे अध्यक्ष रमेश सखाहरी उगले, उपाध्यक्ष इंदुबाई कांतीलाल खोंड, माजी अध्यक्ष संतोषराव लक्ष्मणराव दवंगे, सर्व संचालक, सचिव शिवाजी दवंगे, अंगणवाडी सेविका मंदाबाई गोरे, शोभा चव्हाण, साई एकता तरूण मंडळाचे सर्व सदस्यांसह विविध संस्थांचे आजी माजी अध्यक्ष, संचालक, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिता अहिरे यांनी केले तर किरण उगले यांनी आभार मानले. बालवाडी ते इयत्ता चौथीतील विद्यार्थी विद्यार्थीनींनी यावेळी बहारदार सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले त्याचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.

COMMENTS