बीड । प्रतिनिधीयेथील सौ. के.एस.के. महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी वि

बीड । प्रतिनिधी
येथील सौ. के.एस.के. महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी विर बालदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते हवालदार गुरजितसिंग (51 महाराष्ट्र बटालियन, एनसीसी, छत्रपती संभाजीनगर) उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, शीख धर्माचे दहावे धर्मगुरु गुरु गोविंदसिंग यांच्या दोन लहान सहाबजादे-साहबजादा जोरावरसिंग आणि साहबजादा फत्तेसिंग- यांनी अतिशय लहान वयात, अनुक्रमे सात आणि नऊ वर्षांमध्ये, धर्म व मूल्यांसाठी मोघल सत्तेसमोर बलिदान दिले. विर बालदिवस हा त्यांच्या अतुलनीय शौर्य, धर्मनिष्ठा आणि त्याग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, तर उपप्राचार्य संजय पाटील देवळानगर आणि उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे उपस्थित होते. पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. खान ए. एस., राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ. पोटे बी.टी., राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. यादव घोडके यांच्याही उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी.टी. पोटे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. घोडके यादव यांनी केले, तर आभार डॉ. पल्लवी इरलापल्ले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सय्यद इमाद आणि डॉ. प्रमोद गायके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS