Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेतृत्वाच्या वागण्यातील पोरकटपणा कार्यकर्त्यामध्ये आलाय  

भाजपाचे कर्जत शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर यांचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर 

कर्जत - राजकीय क्षेत्रातील काडीचाही अनुभव नसलेले बाजारबुणगे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकावर व्यक्त होत आहेत.

आरोग्य पत्रिकेनुसार पिकांना खते देण्यासाठी जनजागृती सुरू
कर्जत-जामखेडच्या रस्त्यांसाठी 93 कोटींचा निधी
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड

कर्जत – राजकीय क्षेत्रातील काडीचाही अनुभव नसलेले बाजारबुणगे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकावर व्यक्त होत आहेत. खरेतर हे खेदजनक आहे. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाचे समर्पक उत्तरे न देऊ शकलेले बाजारबुणगे कुठल्याही राजकीय पक्षाच्या लहान मोठ्या पदावर पदसिध्द नाहीत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत सदस्य नाहीत. स्वत:ला राजकारणातील महात्मा समजणाऱ्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या प्रसिद्धी पत्रकात निर्माण झालेल्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आवश्यकता होती, असे भाजपाचे कर्जत शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

क्षीरसागर यांनी पुढे म्हटले आहे, अशा व्यक्तीस मी एका राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपाचा शहराध्यक्ष म्हणून उत्तर देणे योग्य नाही. म्हणून त्यावर जास्त भाष्य न करता फक्त येवढेच म्हणेल राजकीय गाडीखाली चालणाऱ्या पाळीव प्राण्यांना भाजपा पदाधिकारी व नेतृत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी अगोदर स्वत:च्या राजकीय उंचीचा वेध घ्यायला हवा होता. भाजपा पदाधिकाऱ्यांच्या लिखाणातील सुसंस्कृत भाषा आणि तुमच्या लिखाणातील फक्त शिव्याची लाखोली आणि व्यक्तिगत घसरणे यांची तुलना होऊ शकते का ? हीच तुमची राजकीय उंची आहे का ? याला फक्त गावगुंडी म्हणतात.

त्यांनी प्रा. राम शिंदे यांच्यावर तर बोलूच नये. शिंदे हे आमदार होण्यापूर्वीपासून त्यांच्या सोबत असलेले सर्व सहकारी आजही त्यांच्या बरोबर आहेत. पवारांच्या  कार्यवाहीला घाबरून काही भित्रे लोक मतलबापोटी गेले आणि नेत्यांचे कार्यकर्ते झाले. आमच्या पक्षाची काळजी नसावी, आमच्या लोकांचा मान सन्मान आम्ही करतोय.

तुमच्याच पक्षात एका बाजूला फाळके आमचे नेते म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना संपवायचे षडयंत्र करायचे, हे असे करत असाल आणि फाळके बाबतीत त्यांची उपयुक्तता संपल्यासारखे वागत असाल तर त्याची किंमत कधी आणि किती मोजावी लागते याचे मापदंड आपणास माहित होण्यास उशीर लागणार नाही.

राहीला विषय विकासकामाचा, अडीच- तीन वर्षे महाविकास आघाडीच्या सत्ता काळात महत्त्वाचे नेते म्हणून तुमचे नेते मिरवले. सत्ता गेल्यानंतर अल्पमतातील सरकारमध्ये दोन निर्णय घेतले आणि त्याची पिपानी दिवस रात्र वाजवता, हे खरतर या मतदारसंघाचे दुर्दैव म्हणावे लागेल. कारण शिंदे- फडणवीस सरकारने अल्पमतातील सरकारचे सर्व निर्णय बाद केले याचा दोष कोणाचा ? या सर्व प्रकाराचे स्पष्टीकरण न देता उठसुठ राम शिंदे यांच्यावर टीका व दोषारोप करता, याला जनता आता खरोखर वैतागली आहे. खरे तर आपल्या नेतृत्वाच्या वागण्यातील पोरकटपणा कार्यकर्त्यांमध्ये आल्याचे दिसते. त्यातून आपणही किती पोरकट आहात हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते. एखाद्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी नेत्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे किंवा पत्राद्वारे अथवा फोटोग्राफीद्वारे जर इतका विकास होत असता तर सत्ताधाऱ्यांना सत्ता पदी किंवा सत्तेवर येण्याची गरज काय होती ? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणत्याही राजकीय विश्लेषकाची गरज नाही.

या प्रश्नांची उत्तरे द्यावीत  – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी आपल्या क्षमता तपासून फाळकेंसारख्या कार्यकर्तृत्ववान नेतृत्वावर शिंतोडे उडवले असते तर राजकीयदृष्ट्या योग्य झाले असते असे आमचे मत आहे. शेवटी पक्ष संघटना टिकवण्यासाठी व योगदानाबद्दल आक्षेप आताच का घ्यावा लागला. आणि तोही जाहीररित्या मांडून त्यातून साध्य तरी काय करायचे आहे ? फाळकेंची उपयुक्तता संपली आहे का ? फाळकेंना अडगळीत टाकायचे आहे का ? आता आपले इप्सित साध्य झाल्यानंतर फाळके नको आहेत का ? फाळकेंना राजकीयदृष्ट्या उध्वस्त करायचे आहे ? की फाळकेंशिवाय पक्ष चालू शकतो हे दाखवायचे आहे ?या अशा प्रश्नांची उत्तरे सोडून भलतेच भरडु नये.

COMMENTS