Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिवसेंदिवस मुलांच्या तस्करीत होत आहे वाढ

कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशनची बाल तस्करी विरुद्ध जनजागृती मोहीम

बीड प्रतिनिधी - देशात सर्वत्रच दिवसेंदिवस मुलांच्या तस्करीत होत आहे वाढ त्यातून मुलं, मुली गायब होण्याचे प्रकार वाढत असून कैलास सत्यार्थी चिल्ड्

कुळधरणच्या पालखी उत्सवात भाविकांची गर्दी
येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी
पंतप्रधान मोदींचा आज जिल्हाधिकार्‍यांशी संवाद ; देशातील 56 जिल्ह्यांत नगरचाही समावेश

बीड प्रतिनिधी – देशात सर्वत्रच दिवसेंदिवस मुलांच्या तस्करीत होत आहे वाढ त्यातून मुलं, मुली गायब होण्याचे प्रकार वाढत असून कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन नवी दिल्ली यांच्याकडून  आणि  सरस्वती सेवाभावी संस्था भाटवडगाव- माजलगाव या संस्थेने बाल तस्करी विरुद्ध जनजागृती मोहीम नुकत्याच झालेल्या मानवी तस्करी विरुद्धच्या जागतिक दिनानिमित्त औरंगाबाद, बीड, परभणी या जिल्ह्यामध्ये बाल तस्करी विरुद्ध जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे. यावेळी अ‍ॅड.सारिका यादव, बाल तस्करी अभियान राबविण्याकरिता संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.प्रल्हाद कुटे, जिल्हा समन्वयक सारिका यादव, सुलभा ठोके, अरविंद साठे, स्वप्नील कोकाटे, सतीश चोपडे यांनी  बालतस्करी विरुद्ध मोहीम राबविताना यावेळी लोकांना तस्करीविरोधी मोहिमेसाठी प्रेरणा देवून शपथही दिली.

कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन नवी दिल्ली आणि सरस्वती सेवाभावी संस्था माजलगाव यांचे संयुक्त विद्यमाने संस्थेने बस स्टँड, रेल्वे स्टेशन , स्थानिक पोलीस स्टेशन, शाळा, अंगणवाड्या, पंचायती या व्यतिरिक्त ग्रामीण भागात घरोघरी जाऊन बाल तस्करी आणि बालमजुरी विरुद्ध जनजागृती मोहीम राबवलेली आहे आणि लोकांना बाल तस्करी थांबवण्याची शपथ घ्यायला लावत आहे. बाल तस्करी आणि बालमजुरी विरुद्ध लोकांमध्ये जागरूकता पातळी वाढवणे आणि त्यांच्या वाईट गोष्टींची जाणीव करून देणे हे या निरंतर प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे. गेल्या दशकात देशातील केंद्र आणि राज्य सरकारने बाल तस्करीवर मात करण्यासाठी अनेक ठोस पावले उचललेली असली, तरी सर्वसामान्यांमध्ये जागरूकतेच्या अभावामुळे हे प्रयत्न पूर्णत: यशस्वी होऊ शकलेले नाहीत. देशाच्या विविध भागांमध्ये अनेक दशकांपासून बाल शोषण किंवा मुलांची तस्करी रोखणे हे एक मोठे आव्हान आहे. सरकारी आणि निमसरकारी स्तरावरील प्रयत्नांमुळे तस्करीच्या गुन्ह्यांची नोंद वाढली असली तरी अजूनही बरेच काही करायचे बाकी आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो 2021 च्या आकडेवारीनुसार देशात दर तासाला नऊ मुले बेपत्ता होतात, तर दररोज आठ मुलांची तस्करी होते. अहवालात म्हटले आहे की 2021 मध्ये देशात 77,535 मुले बेपत्ता झाली, जी सन 2020 च्या तुलनेत 31 टक्क्यांनी जास्त झालेली आहे. देशात लहान मुलांच्या तस्करीच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना, सरस्वती सेवाभावी संस्था भाटवडगाव  चे सचिव रमेश कुटे म्हणाले की आज अधिकाधिक लोक हरवलेल्या मुलांची तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत हे खरं आहे, हे स्वतःच एक मोठा बदल आहे. घरोघरी जाऊन आपण तळागाळात सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेमुळे लोकांची मानसिकता बदलली आहे आणि त्याचे सुखद परिणाम मिळत असल्याचे हे द्योतक आहे. सरकार आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्या संस्था बाल तस्करी रोखण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत, परंतु देशातून ही संघटित गुन्हेगारी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी तस्करीविरोधी कठोर कायद्याची नितांत गरज आहे, म्हणून सरकार 2025 मध्ये तस्करीविरोधी विधेयक आणणार आहे. संसदेने, ते लवकर मंजूर करावे अशी मागणी पत्रकाआधारे करण्यात आली आहे.

COMMENTS