Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भांडुपमध्ये स्लॅब कोसळून चिमुरड्याचा मृत्यू

मुंबई : भांडुप परिसरातील एका घरामधील स्लॅब मंगळवारी मध्यरात्री अंगावर कोसळल्यामुळे पाच वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. याबाबत भांडुप पोलिसांनी

नवे शिक्षण धोरण
पंतप्रधान मोदींसाठी मणिपूर भारत नाही का ?
उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरें मध्ये हिंम्मत आहे का राहुल गांधींना जोड्याने मारण्याची – अनिल बोंडे

मुंबई : भांडुप परिसरातील एका घरामधील स्लॅब मंगळवारी मध्यरात्री अंगावर कोसळल्यामुळे पाच वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. याबाबत भांडुप पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. भांडुपमधील क्रॉसरोड परिसरातील झकारिया इमारतीमधील तिसर्‍या मजल्यावरील एका घरात मध्यरात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली. इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर तासीब शेख (5) आई – वडिलांसोबत राहत होता. रात्री तासीब घरात झोपला होता. त्यावेळी अचानक छताचा स्लॅब त्याच्या अंगावर कोसळला. त्यात तासीब गंभीर जखमी होवून त्यातच त्याचा मृत्यू झाला.

COMMENTS