Homeताज्या बातम्यादेश

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट

नवी दिल्ली :जम्मू-काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. केंद्राकडून लवकरच ही प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते, अशी माहिती आहे. मात्र,

दुष्काळ दारात…
वीजपंप चोरणारे आरोपी अटकेत
 कार्तिक आणि क्रितीच्या ‘शहजादा’ चा टीझर रिलीज

नवी दिल्ली :जम्मू-काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. केंद्राकडून लवकरच ही प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते, अशी माहिती आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात मोठी बैठक झाली. सत्ता स्थापनेनंतर पहिल्याच बैठकीत नॅशनल कॉन्फरन्स सरकारने राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव संमत केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याची प्रक्रिया सुरू करू शकते. नुकत्याच पार पडलेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झाले. या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्याला वेगळा दर्जा तसेच अन्य विविध मुद्यांवर चर्चा केली. अर्धा तास चाललेली ही बैठक अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आश्‍वासन गृहमंत्र्यांनी नव्या सरकारला दिले आहे.

COMMENTS