Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट 

मुंबई प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज या

‘सिडको’चे हक्काचे घर मिळालेले भाग्यशाली : उपमुख्यमंत्री शिंदे
सावित्रीबाईं फुलेंचे 10 एकरात भव्य स्मारक उभारणार
अतिवृष्टीग्रस्तांच्या भरपाई रकमेत दुपटीने वाढ

मुंबई प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  यावेळी राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते उपस्थित होते.   

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत महिममध्ये समुद्रात तयार झालेल्या अनधिकृत बांधकामाचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला होता. यावेळी त्यांनी सरकारने हे अनधिकृत बांधकाम त्वरित हटवावे असेही सांगितले होते. त्यांनी ही मागणी केल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत सरकारने मुंबई महानगरपालिकेला तसे निर्देश देऊन हे अनधिकृत बांधकाम हटवले होते. त्यानंतर या दोघांमध्ये ही सदिच्छा भेट होत असल्याने या भेटीला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

COMMENTS