Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड

नाशिक: नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सन 2022 निवडसुचीकरिता बिगर नागरी राज

या जिल्ह्यातील बँकेवर चोरट्यांनी मारला डल्ला , एवढी रक्कम केली लंपास | LOK News 24
वडिलांच्या स्मरणार्थ गावासाठी बांधून दिला साडेपाच लाखाचा सभामंडप
राज्य महिला आयोगाच्या उर्वरित सदस्यांची नेमणूक करू – रूपाली चाकणकर (Video)

नाशिक: नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सन 2022 निवडसुचीकरिता बिगर नागरी राज्य सेवा अधिकारी यांच्यामधून घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत निवड करण्यात आली आहे. राज्यसेवेतील अधिकाऱ्यांमधून महाराष्ट्र राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील 4 पदांची निवड करण्याकरिता दि. 29.11.2023 रोजी ऑनलाईन परीक्षा ही मुंबई येथे घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल दि. 04.12.2023 रोजी जाहिर करण्यात आला होता व त्यात 20 अधिकारी उत्तीर्ण झाले होते. या 20 अधिकाऱ्यांच्या मुलाखती नवी दिल्ली येथे दि. 26.12.2023 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आल्यात. सदर परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवार दि. 24.05.2024 रोजी जाहिर करण्यात आला असून त्यात नाशिक जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ. चव्हाण हे मालेगाव येथील रहिवाशी असून त्यांचे शिक्षण एम.एस.सी (अॅग्रिकल्चर), पी.एच.डी. आणि एल.एल.बी. झाले असून 2004-07 या कालावधीत वरिष्ठ संशोधन सहायक व 2007-2011 या कालावधीत सहायक प्राध्यापक म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे काम केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांची सन 2011 मध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवामध्ये निवड झाल्यानंतर त्यांनी सन 2012-17 या कालावधीत सहायक आयुक्त, दुग्ध विकास विभाग, मुंबई येथे, सन 2017-20 या कालावधीत सहायक संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग, नाशिक येथे व सन 2020-23 या कालावधीत सहायक संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग, जळगाव येथे कामकाज केले आहे. सन 2023 मध्ये त्यांची पदोन्नती उप संचालक या संवर्गात झाल्यानंतर त्यांची नियुक्ती मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक येथे करण्यात आली होती व ते दि. 14.08.2023 पासून या पदावर कार्यरत आहेत.

जिल्हा परिषदेमध्ये हजर झाल्यानंतर आपल्या कार्यकशुल कार्यशैलीमुळे लेखा विभागात उत्कृष्ठ कामकाज करून आपल्या कामकाजाचा ठसा उमटविला आहे. डॉ. चव्हाण यांच्या उतुंग यशाबद्दल नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी व नाशिक जिल्हा परिषदेचे माजी मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, सामान्य प्रशासनाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, लेखा अधिकारी प्रदीप चौधरी, रमेश जोंधळे, प्रकाश बानकर, सर्व विभाग प्रमुख, तसेच जिल्हा परिषदेतील वित्त विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सर्व संघटना यांनी त्यांचे अभिनंदन केले. नाशिक जिल्हा परिषदेत कार्यरत असताना भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झालेले डॉ. चव्हाण हे पहिलेचे अधिकारी आहेत व महाराष्ट्र राज्यातून निवड आलेल्या 4 अधिकाऱ्यांमध्ये वित्त विभागातील ते एकमेव अधिकारी आहेत. याबद्दलही त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

COMMENTS