Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सातारा जिल्ह्यात दाखल : जिल्हाधिकारी

सातारा / प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे जिल्ह्यात दाखल झाली असून शिवशस्त्र शौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख

वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे कोयना विभाग त्रस्त; आजपासून सर्वपक्षीय धरणे आंदोलन
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील सर्व निवडणुका महाडिकांसोबत लढणार : वैभव नायकवडी
लोकराज्य विद्या फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त स्मशानभूमीत पुरस्कार वितरण

सातारा / प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे जिल्ह्यात दाखल झाली असून शिवशस्त्र शौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. 19 जुलै रोजी दुपारी 12.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे होणार आहे.
शनिवार, दि. 20 जुलैपासून हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. वाघनखे सात महिने सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सर्व दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहील. याची तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने नागरिकांना उपलब्ध करून घेता येतील. हे प्रदर्शन एकावेळी दोनशे लोकांना पाहता येतील येईल. दिवसभरातून यासाठी चार स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये पहिला प्लॉट विद्यार्थ्यांसाठी मोफत राहणार आहे. दुपारी 1 वाजेच्या पुढील उर्वरित तीन स्लॉट हे नागरिकांना नाममात्र शुल्क आकारून पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

COMMENTS