Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण मूलभूत सुविधा पासून वंचित

क्रीडांगण मधील महापुरुषांचे पुतळे अंधारात!

बीड प्रतिनिधी - छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण मधील व्यायामाचे साहित्यसह महापुरुषांचे पुतळे अंधारात असल्याने येथील येणार्‍या नागरिकांना अंधारातू

भाजप उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले | LOKNews24
राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे : उदय सामंत यांचे अफगाणी विद्यार्थ्यांना आश्वासन
पावसाळ्यात अतिवृष्टीने निर्माण होणार्‍या पुरग्रस्त भागाची पहाणी

बीड प्रतिनिधी – छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण मधील व्यायामाचे साहित्यसह महापुरुषांचे पुतळे अंधारात असल्याने येथील येणार्‍या नागरिकांना अंधारातूनच व्यायाम करावा लागत असून लाईट असून बंद असल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण मध्यभागी असल्याने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरीक व्यायामासाठी येतात परंतु या ठिकाणी मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांची अडचण पाहण्यास मिळत आहे. क्रीडांगण मधील महापुरुषांचे पुतळे देखील अंधारातच असल्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
बीड शहरातील छत्रपती संभाजी क्रिडांगणा मध्ये साहित्य मोडकळीस आले असून बर्‍याच खांबावरील लाईट  बंद आहेत,यातील बरेच साहित्याची मोड तोड झाल्याने रोज सकाळी,सायंकाळी फिरण्यासाठी येणार्‍या नागरिकांचा हिरमोड होत असून ज्या ठिकाणी हें साहित्य आहे तेथील विधुत खांबावरील पथदिवे बंद आहेत त्यामुळे अंधारात एखादी घटना किंवा चोरीचे प्रकार होण्याची शक्यता आहे.गेट दिवस-रात्र उघडे असल्यामुळे दुचाकी वाहन धारक गाड्या गेट च्या आत वॉकींग ट्रॅकवर लावतात त्यामुळे चालण्यास अडथळा निर्माण होत असून एखादा वॉचमन ची नेमणूक करायला पाहिजे.या क्रिडांगणा वरील बर्‍याच खांबावरील लाईट बंद आहेत.नवीन साहित्य धूळखात पडले असून ते लावण्याची गरज आहे.  या क्रिडांगणावर लहान मुलं,महिला,पुरुष येत असून हें क्रिडांगणाला कोणीच वाली नसल्याचे दिसून येत आहे आओ जाओ घर तुम्हारा असंच म्हणाव लागेल.बीड नगरपालिका याकडे लक्ष देईल का? असा प्रश्न येथे येणार्‍या नागरिकांना पडला असून.भावी नगरअद्यक्षासह लोकप्रतिनिधी देखील याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे.

COMMENTS