संगमनेर ः धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठाणच्या वतीने संभाजी महाराज यांची जयंती काल मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध
संगमनेर ः धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठाणच्या वतीने संभाजी महाराज यांची जयंती काल मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काल मंगळवारी सायंकाळी संगमनेर बस स्थानक परिसरात आयोजित कार्यक्रमात चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आले.
यावेळी धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त काल सायंकाळी संगमनेर बस स्थानक परिसरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महिलांच्या हस्ते शंभू राजेंचा पाळणा झुलवणे व महाआरती करिता अध्यक्ष परफेक्ट फांउडेशनच्या सुनिता कोडे, अरूणा घोलप, सोनाली बोटवे, पूजाताई अरगडे, रेखाताई गलांडे, शामल बेल्हेकर आदी. महिलांची उपस्थिती होती. मुकेश नरवडे यांचा जाणता राजा मर्दानी आखाडा व विविध खेळ, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे लिखित शिवराय समजून घेताना या पुस्तकाचे वितरण, शिवकालीन शस्त्र, ऐतिहासिक नाणे व दस्तऐवज उद्घाटन व प्रदर्शन असे कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी संगमनेर तालुका व जिल्ह्यातील गोरक्षकांना धर्मरक्षक सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संगमनेर बस स्थानक परिसरात झालेल्या कार्यक्रमात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी युवक व युवतींनी दांडपट्टा, लाठी फिरविणे आदी चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
COMMENTS