नाशिक प्रतिनिधी - लोकसभेच्या नाशिकच्या जागेवरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेने शिंदे गट आणि भाजपच्या सुरु असलेल्या संघर्षादरम्या
नाशिक प्रतिनिधी – लोकसभेच्या नाशिकच्या जागेवरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेने शिंदे गट आणि भाजपच्या सुरु असलेल्या संघर्षादरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही या जागेवर दावा केला आहे. छगन भुजबळ हे नाशिकमधून लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा आता जोर धरु लागल्या आहेत. छगन भुजबळ यांची नाशिकमधून उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भुजबळ नाशिकमधून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत.
सध्या सुरु असलेल्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी म्हटलं की, माझं नाव तर तुम्हीच चर्चेत आणले आहे. महायुतीत नाशिकच्या जागेवर अजून चर्चा सुरू आहे. बऱ्याच जागेवर एकमत झाले आहे. नाशिकच्या जागेसाठी अनेकजण मुंबईला जाऊन आलेत. मात्र भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी तीनही पक्ष नाशिकच्या जागेवर चर्चा करत आहेत. चर्चेनंतर जो कुणी उमेदवार ठरेल त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. भुजबळ कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्,या असे मी सांगितले नाही. फक्त शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या आम्हाला द्या, अशी मागणी केली असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
COMMENTS