Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छगन भुजबळ विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ मंत्री पदाचा व विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा- करण गायकर 

नाशिक प्रतिनिधी - छगन भुजबळ राष्ट्रपती की पंतप्रधान की न्यायाधीश आहेत मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ नका म्हणायला भुजबळांनी हे विसरू नये की

छावा क्रांतिवीर सेनेमध्ये संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक तरुणांचा प्रवेश 
मुंबई येथे होणाऱ्या मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या आंदोलनात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा -करण गायकर
कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ केंद्र व राज्य सरकारने उठवावी अन्यथा शेतकऱ्याच्या रोशाला सामोरे जाण्याची ताकद ठेवावी- करण गायकर 

नाशिक प्रतिनिधी – छगन भुजबळ राष्ट्रपती की पंतप्रधान की न्यायाधीश आहेत मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ नका म्हणायला भुजबळांनी हे विसरू नये की ते एका संविधानिक पदावर आहेत.मराठा समाजाने भुजबळ यांना आतापर्यंत साथ दिली आहे परंतु यानंतर छगन भुजबळ यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी मराठा तयार झालेला आहे.भुजबळ साहेब तुम्ही मराठ्यांच्या विरोधात जेवढे रानपेटवर तितक्या मताने मराठी तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत पाडतील हेही लक्षात घ्या

आज जालना जिल्ह्यातील अंबड या शहरात ओबीसी नेत्यांनी स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी व अस्तित्व आहे असं दाखवण्यासाठी सभा घेण्यात आली. या सभेत ओबीसी समाजाला न्याय कसा देता येईल त्यांची प्रगती कशी करता येईल हे सोडून मराठा समाजावर टीका करण्यात आली व मराठा समाजाच्या नेत्यावर पण अतिशय खालच्या पातळीला जाऊन या सर्व ओबीसी नेत्यांनी टीका केली त्याचा आम्ही सकाळ मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो.मराठा समाजाला आता कुठेतरी आरक्षण मिळाण्याची उम्मीद असताना मंत्री छगन भुजबळ व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दोन समाजात वाद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.  या दोन्ही नेत्यांना व ओबीसी नेत्यांना आवाहन आहे की सर्वसामान्य ओबीसी बांधव हे मराठा समाजासोबत आहेत. पहिले ही होते आता पण आहेत त्यामुळे आपण मोजके काही नेते मिळून मराठा समाज व ओबीसीत वाद निर्माण करू नये उद्या महाराष्ट्रामध्ये वक्तव्यांवरून जर वाद पेटला तर याला सर्वस्वी जबाबदार हेच ओबीसी नेते असतील हे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना आमचं सांगणे आहे. 

महाराष्ट्रात राज्याचे सत्ताधारी मंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते हे जर एका समाजाच्या विरोधात एकत्र येत असतील तर मराठा समाजाला न्याय कसा मिळेल आणि यांच्या या वक्तव्याला धरून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांच्या बाजूने बोलून मराठा समाजाची दिशाभूल किंवा फसवणूक करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना मराठा समाजाला आता 50% च्या आत त्याच्या हक्काचे उपस्थितीतून आरक्षण मिळाले पाहिजे तसेच सरसकट कुणबीचे दाखले मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मिळाले पाहिजे अन्यथा मराठा समाज सुद्धा आता शांत बसणार नाही महाराष्ट्राची शांतता अबाधित ठेवायची असेल तर या दोन्हीही नेत्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा मराठा समाज कोणाच्याही विरोधात नाही कोणत्याही जातीच्या विरोधात नसताना अशा पद्धतीने मराठा समाजाचा द्वेष करून हे दोन्हीही नेते त्यांच्याकडे असलेल्या संविधानिक पदाचा गैरवापर करत असून या दोघांचेही तात्काळ राजीनामे घ्यावेत यांना मंत्रिमंडळातून तसेच विरोधी पक्षनेते या पदावरून अकालपट्टी करावी ही सकल मराठा समाज म्हणून आमची मागणी आहे.

24 डिसेंबर ही अंतिम तारीख असून या तारखेपर्यंत मराठा समाज राज्य सरकारवर विश्वास ठेवून आहे परंतु आमचा विश्वासघात झाला तर मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित मुंबईत मराठा काय आहे हे सरकारला बघायला मिळेल व त्यावेळी जे काही परिणाम होतील या सर्वस्वी जबाबदार राज्यकर्ते शासन प्रशासन असेल.

COMMENTS